पॉप स्टार प्रिन्सच्या मृत्यूने ओबामा शोकाकुल
By admin | Published: April 23, 2016 01:19 AM2016-04-23T01:19:55+5:302016-04-23T01:19:55+5:30
संगीत जगतात सध्या दु:खाची छाया पसरलेली आहे. लेजेंडरी पॉपस्टार प्रिन्स यांचा 57 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने न केवळ सामान्य चाहते तर दस्तूरखुद्द बराक ओबामादेखील दु:खी झाले आहेत
संगीत जगतात सध्या दु:खाची छाया पसरलेली आहे. लेजेंडरी पॉपस्टार प्रिन्स यांचा 57 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने न केवळ सामान्य चाहते तर दस्तूरखुद्द बराक ओबामादेखील दु:खी झाले आहेत.
सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असलेल्या ओबामांनी दिलेल्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे की, जगाने आज एक सर्वोत्तम संगीतकार गमावला आहे. मी आणि माझी पत्नी मिशेल प्रिन्सच्या लाखो चाहत्यांच्या दु:खात सामील आहोत. असे लोक फार दुर्मिळ असतात जे आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्या क्षेत्रात क्रांती घडवून आणतात. प्रिन्स त्यांपैकी एक होता.प्रिन्स रॉजर्स नेल्सन असे त्यांचे संपूर्ण नाव होते. मिनेपोलिस निमशहरी भागातील राहत्या घरी त्यांचा मृतदेह सापडला. गाण्यांतून प्रिन्स सदैव आपल्यासोबत राहील, असेदेखील ओबामांनी या शोकसंदेशात म्हटले आहे.