ओबामांचे धोरण ट्रम्प यांनी बदलले!

By admin | Published: March 30, 2017 01:51 AM2017-03-30T01:51:22+5:302017-03-30T01:51:22+5:30

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे हवामान बदलविषयक धोरण बदलण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

Obama's policy changed by trump! | ओबामांचे धोरण ट्रम्प यांनी बदलले!

ओबामांचे धोरण ट्रम्प यांनी बदलले!

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे हवामान बदलविषयक धोरण बदलण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वादग्रस्त कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
ट्रम्प यांनी पर्यावरण संरक्षण एजन्सीच्या (ईपीए) आदेशावर स्वाक्षरी केली आहे. कोळसा उद्योगाला समर्थन देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी प्रचाराच्या काळात दिले होते. त्याची ही पूर्तता समजली जात आहे. उत्पादन आणि रोजगार निर्मितीच्या एका नव्या युगााची ही सुरुवात असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेत ऊर्जेवरील प्रतिबंध हटविणे, सरकारी हस्तक्षेप समाप्त करणे आणि नोकऱ्या संपविणारे धोरण रद्द करण्यासाठी आपण हे ऐतिहासिक पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प म्हणाले, अमेरिकेत नोकऱ्यांची निर्मिती करणे आणि येथील संपत्ती वाढविणे यासाठी अलीकडे घेण्यात आलेल्या निर्णयापैकी एक आहे. अमेरिकेच्या समृद्धीची होणारी चोरी आम्ही थांबवीत आहोत. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव सीन स्पाइसर म्हणाले की, ट्रम्प यांना पूर्ण विश्वास आहे की, पर्यावरण सुरक्षा आणि आमच्या अर्थव्यवस्थेचा विकास यांचा परस्पर संबंध नाही.

ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्षअखेरीस अमेरिका दौऱ्यासाठी निमंत्रण दिले आहे. या दोन नेत्यांनी सोेमवारी फोनवर चर्चा केली. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या यशाबाबत ट्रम्प यांनी फोन करून मोदींचे अभिनंदन केले. व्हाइट हाउसने ही माहिती दिली आहे.
व्हाइट हाउसच्या वेबसाइटवर म्हटले आहे की, मोदींच्या आर्थिक सुधारणा धोरणाला ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या वर्षाच्या अखेरीस मोदी अमेरिकेत येतील, अशी अपेक्षा आहे. जाणार नाही. संबंधित कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणालाही सीसीटीव्ही फुटेज दिले जाणार नाही.

Web Title: Obama's policy changed by trump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.