ओबामांना मंत्र्यांकडून भारत दौऱ्याची माहिती

By admin | Published: August 29, 2014 02:33 AM2014-08-29T02:33:06+5:302014-08-29T02:33:06+5:30

अमेरिकेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती अध्यक्ष बराक ओबामा यांना दिली.

Obama's visit to India by the ministers | ओबामांना मंत्र्यांकडून भारत दौऱ्याची माहिती

ओबामांना मंत्र्यांकडून भारत दौऱ्याची माहिती

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती अध्यक्ष बराक ओबामा यांना दिली.
गृहमंत्री जॉन केरी आणि परराष्ट्रमंत्री चक हगेल यांनी अनुक्रमे सोमवारी व मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये ओबामा यांची भेट घेऊन त्यांना दौऱ्यातील चर्चेची माहिती दिली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ओबामा यांनी त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले होते. मोदी यांच्या या दौऱ्याच्या तारखा आम्ही निश्चित करत आहोत. मोदी यांना भेटण्यास ओबामा उत्सुक आहेत’, असे व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जोश अर्नेस्ट यांनी बुधवारी वार्ताहरांना सांगितले. मोदी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेला भेट देतील, अशी अपेक्षा आहे. या दौऱ्यात ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहतील व नंतर बराक ओबामा यांना भेटतील.

Web Title: Obama's visit to India by the ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.