ऑफिसमध्ये अधिकारी करायचे अश्लील चॅट, महिला बॉसने शिकवला धडा, १०० जणांना दाखवला घरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:57 IST2025-02-26T18:56:08+5:302025-02-26T18:57:07+5:30

United State News: गुप्तचर विभागाच्या कार्यालयात बसून काही अधिकारी हे चॅटवर अश्लील गप्पा मारायचे. तसेच फोटो व्हिडीओ शेअर करायचे. मात्र सत्तांतर होऊन कार्यालयामध्ये नवी महिला बॉस आल्यानंतर हा प्रकार पाहून तिला धक्का बसला. तिने तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि एका पाठोपाठ एक अशा १०० अधिकाऱ्यांना घरची वाट दाखवण्याचा निर्णय घेतला.  

Obscene chat with officers in office, lesson taught by female boss, 100 people shown the way home | ऑफिसमध्ये अधिकारी करायचे अश्लील चॅट, महिला बॉसने शिकवला धडा, १०० जणांना दाखवला घरचा रस्ता

ऑफिसमध्ये अधिकारी करायचे अश्लील चॅट, महिला बॉसने शिकवला धडा, १०० जणांना दाखवला घरचा रस्ता

सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत काही अलिखित नियम असतात. त्यातही अधिकाऱ्यांकडून उच्च दर्जाच्या शिष्टाचाराची अपेक्षा बाळगली जाते. हा शिष्टाचार मोडला गेल्यास अनेक समस्या उद्भवतात. दरम्यान, अमेरिकेमध्ये एका ऑफिसमध्ये घडलेल्या घटनेची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. येथे गुप्तचर विभागाच्या कार्यालयात बसून काही अधिकारी हे चॅटवर अश्लील गप्पा मारायचे. तसेच फोटो व्हिडीओ शेअर करायचे. मात्र सत्तांतर होऊन कार्यालयामध्ये नवी महिला बॉस आल्यानंतर हा प्रकार पाहून तिला धक्का बसला. तिने तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि एका पाठोपाठ एक अशा १०० अधिकाऱ्यांना घरची वाट दाखवण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेची नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीच्या डायरेक्टर तुलसी गबार्ड यांनी याबाबत सांगितले की, अश्लील चॅटिंग करणाऱ्या गुप्तचर विभागाच्या १०० हून अधिक अधिकाऱ्यांचा शोध घेण्यात आला आहे.  या लोकांनी विश्वास तोडला आहे. तसेच संस्थेच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे मी अशा सर्व अधिकाऱ्यांना त्वरित बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सोईसुविधा बंद करण्यात येतील. गुप्तचर विभागाची ही व्यवस्था व्यावसायिक वापरासाठी करण्यात आली आहे. मात्र या लोकांनी त्याचा वैयक्तिक वापर केला, अशा शब्दात गबार्ड यांनी संताप व्यक्त केला.

चॅटरूममध्ये अश्लील चॅट होत असल्याचा गौप्यस्फोट पहिल्यांदा सिटी जर्नलमधील पत्रकार ख्रिस्टोफर रुफो यांनी केलं होतं. त्यानंतर अमेरिकेत खळबळ माजली होती. तुलसी गबार्ड ह्या जेव्हा नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीच्या संचालक बनल्या. तेव्हा त्यांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.

डीएनआयच्या प्रवक्त्या एलेक्सा हेनिंग यांनी प्रतिक्रिया देताना एक्सवर लिहिले की, या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची शुक्रवारपर्यंत ओळख पटवून त्यांना निलंबित करण्यात यावे असे आदेश सर्व गुप्तचर यंत्रणांना देण्यात आले आहेत. तसेच कुठल्याही प्रकारचे अश्लील, पोर्नोग्राफिक आणि वाईट संदेश पाठवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडण्यात येऊ नये, असे आदेस गुप्तचर यंत्रणांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, तुलसी गबार्ड यांनी दिलेल्या आदेशांनंतर गुप्तचर विभागात खळबळ उडालेली आहे. तसेच या प्रकरणा त दोषी आढळलेले अधिकारी आपली नोकरी वाचवण्यासाठी तुलसी गबार्ड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.  

Web Title: Obscene chat with officers in office, lesson taught by female boss, 100 people shown the way home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.