३ दिवस ३ रात्रीत ८ बाळांना जन्म देणाऱ्या आईचं दु:खद निधन, सर्व बाळांच्या मृत्यूनंतर जगणं झालं होतं अवघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:49 PM2022-02-04T18:49:30+5:302022-02-04T18:53:15+5:30
Octomum Dies : The Sun च्या वृत्तानुसार, ऑक्टोमम मॅंडी ऑलवुडने २६ वर्षाआधी जगभरात तिची चर्चा झाली होती. तिने घोषणा केली होती की, तिला ऑक्टोप्लेट्स होण्याची आशा आहे.
कधी जगात ऑक्टोमम (Octomum Dies) नावाने चर्चेत राहिलेल ५६ वर्षीय महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाला. ही महिला तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने तीन दिवस आणि तीन रात्री आठ बाळांना जन्म दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे या बाळांच्या तिच्या कुशीतच मृत्यू झाला होता. The Sun च्या वृत्तानुसार, ऑक्टोमम मॅंडी ऑलवुडने २६ वर्षाआधी जगभरात तिची चर्चा झाली होती. तिने घोषणा केली होती की, तिला ऑक्टोप्लेट्स होण्याची आशा आहे.
जगाला तिच्या दु:खाबाबत काही महिन्यांनंतर समजलं की, २४ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर ६ मुलांना आणि २ मुलींना ३ दिवस व २ रात्रीत जन्म दिला होता. पण दुर्दैवाने त्यातील एकही बाळ वाचू शकलं नाही. मॅंडीला व्यक्तीगत रूपाने ब्रिटनची राजकुमारी प्रिन्सेस डायना हिनेही दिलासा दिला होता.
या धक्कादायक घटनेनंतर तिचं जीवन नियंत्रणाबाहेर गेलं होतं. कारण ती तिचा पार्टनर पॉल हडसनपासून वेगळी झाली होती. तसेच तिला दारूचीही सवय लागली होती. त्यानंतर तिला पुन्हा तीन बाळ झालेत, पण ८ बाळ गमावण्याच्या दु:खातून ती कधीच बाहेर येऊ शकली नाही.
अनेक वर्ष एकटी राहिली
मॅंडीला नोव्हेंबर २००७ मध्ये रश ड्रायव्हिंगसाठी अटक करण्यात आली होती. त्यावेळी कारमध्ये तिच्यासोबत तिचे तीन बाळही होते. नंतर तिच्याकडून बाळांची कस्टडी काढून घेण्यात आली होती. ती तिच्या परिवारापासून वेगळी झाली. यानंतर ती एकटी राहत होती. एका वेदनादायी जीवनाच्या अखेरच्या काळात तिच्याजवळ कुणीच नव्हतं. तिचा अंत्यसंस्कारही स्थानिक परिषदेद्वारे केलं होतं. ज्यात कुणी शोक व्यक्त करायलाही आलं नाही.
मॅंडीने आपल्या बाळांची ठेवली होती नावे
मॅंडीने गमावलेल्या ऑक्टोप्लेट्सची नावं किप्रोस, एडम, मार्टिन, कॅसियस, नेल्सन, डोनाल्ड, किताली आणि लेने ठेवली होती. या सर्वांना छोट्या बॉक्सेसमध्ये दफन करण्यात आलं होतं.
तिच्या कुशीत एकेकाने सोडला जीव
मॅंडीने सांगितलं होतं की, 'तीन दिवस आणि तीन रात्रीत मी आठ बाळांना जन्म दिला होता. मी त्यातील प्रत्येकाला अडीच तास माझ्याजवळ ठेवलं. कारण ते माझ्या कुशीत मरत होते. हे फारच धक्कादायक होतं. खरंच भयानक. जेव्हा शेवटचं बाळ येत होतं तेव्हा मी म्हणाले होते, हे देवा. त्यातील एकाला तरी जीवंत राहू दे'.
मॅंडी दक्षिण लंडनच्या वेस्ट नॉरवुडमधील स्मशानभूमीत आपल्या आठ बाळांसाठी दरवर्षी फूल नेत होती. ती म्हणाली होती की, 'मी माझ्या लहान मुलांना कधीच विसरणार नाही. पण हे तुम्ही बदलू शकत नाही'.