आॅक्टोपसला एकापेक्षा अधिक हृदय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2017 02:04 AM2017-02-07T02:04:18+5:302017-02-07T02:04:18+5:30
प्राण्याला हृदय किती असतात? असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर एक असेच येईल. पण, तुम्हाला हे माहित आहे का, काही प्राण्यांना एकापेक्षा अधिक हृदय असतात
प्राण्याला हृदय किती असतात? असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर एक असेच येईल. पण, तुम्हाला हे माहित आहे का, काही प्राण्यांना एकापेक्षा अधिक हृदय असतात. आॅक्टोपसला एक मुख्य हृदय आणि दोन छोटे हृदय असतात. रक्त प्रवाही करण्याचे काम हे छोटे हृदय करतात. समुद्रात आढळणाऱ्या माशांच्या जातीतील हॅगफिशला एक मोठे मुख्य हृदय असते. त्याचे तीन भागात वर्गीकरण आहे. रक्त प्रवाहीत करण्यासाठी तीन पंप यात असतात. एकापेक्षा अधिक हृदय असले, तरी त्यांचे कार्य मात्र वेगवेगळे आहेत. फक्त अशा दुर्मीळ प्राण्यांमध्येच हे प्रकार पाहायला मिळतात.