Baba Ramdev: बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:48 PM2021-06-09T16:48:45+5:302021-06-09T16:50:34+5:30

Baba Ramdev: नेपाळ सरकारने बाबा रामदेव यांना धक्का देत कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

officials said nepal stops distribution of coronil kits gifted by patanjali | Baba Ramdev: बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी; नेमकं कारण काय?

Baba Ramdev: बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी; नेमकं कारण काय?

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनिलवर बंदी घालणारा नेपाळ दुसरा देशकोरोनिलचे १५०० किट नेपाळला केले होते गिफ्टपतंजलीने दिले स्पष्टीकरण

काठमांडू: कोरोना विषाणू संसर्गाने देशात शिरकाव केल्यानंतर अनेकांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनिल या औषधाची निर्मिती करत कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला होता. मात्र, देशात याच्या वापराला मान्यता देण्यात आली नाही. यानंतर शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळ, भूतान येथेही कोरोनिल पाठवण्यात आले होते. मात्र, नेपाळ सरकारने बाबा रामदेव यांना धक्का देत कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. (officials said nepal stops distribution of coronil kits gifted by patanjali)

कोरोनिल औषध करोना विषाणूच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा एकही ठोस पुरावा नसल्याचे नेपाळने म्हटले आहे. स्थानिक वृत्तानुसार, कोरोनिलच्या १५०० किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. नेपाळच्या आयुर्वेद आणि पर्यायी औषध विभागाने तसे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. 

अमेरिकेशी पंगा घेणं पडलं भारी; रशियन हॅकर्सकडून वसूल केले ४ लाख डॉलर्स

कोरोनिलचे १५०० किट मोफत पाठवले

कोरोनिलच्या १५०० किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळेच कोरोनिलचे वितरण तात्काळ थांबविण्यात आले. बाबा रामदेव यांनी नेपाळमध्ये कोरोनिलचे १५०० किट मोफत पाठवले होते. कोरोनिल किटमधील औषधे कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी प्रभावी नाही, असे नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलवर बंदी घालण्याबाबत कोणतेही आदेश सरकारने दिले नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. 

“मला आनंद आणि अभिमान वाटतो की...”; पाचवीतील मुलीने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

कोरोनिलवर बंदी घालणारा नेपाळ दुसरा देश

कोरोनिलच्या वितरणावर बंदी घातलेला नेपाळ हा दुसरा देश आहे. अलीकडेच भूतान औषध नियामक प्राधिकरणाने या औषधाच्या वितरणावर बंदी घातली. मात्र, दुसरीकडे कोरोनिल किट अद्याप नेपाळमध्ये नोंदणीकृत झालेली नाही. त्यामुळे त्याची व्यावसायिक विक्री अथवा वितरण होऊ शकत नाही. नेपाळ सरकारला कोरोनिल किट भेट म्हणून देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण देत आवश्यक इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे पतंजलीने म्हटले आहे. 
 

Web Title: officials said nepal stops distribution of coronil kits gifted by patanjali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.