अरेच्चा! 8 वर्ष एकच सूट वापरत होते बराक ओबामा, पत्नीचा खुलासा

By admin | Published: June 12, 2017 05:18 PM2017-06-12T17:18:17+5:302017-06-12T17:23:35+5:30

एकीकडे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महागड्या सूटबूटची चर्चा सुरू असताना अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांबाबत वेगळंच वृत्त

Oh! Barack Obama, the wife's disclosure, was using a single suit for 8 years | अरेच्चा! 8 वर्ष एकच सूट वापरत होते बराक ओबामा, पत्नीचा खुलासा

अरेच्चा! 8 वर्ष एकच सूट वापरत होते बराक ओबामा, पत्नीचा खुलासा

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 12 - एकीकडे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महागड्या सूटबूटची चर्चा सुरू असताना अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांबाबत वेगळंच वृत्त आलं आहे. बराक ओबामा यांनी 8 वर्षांपर्यंत एकच जॅकेट वापरलं असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा कदाचीत विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे. 
 
व्हाइट हाउसमधल्या 8 वर्षांच्या काळात ओबामांनी ब्लॅक टक्सडो याच जॅकेटचा सर्वाधिक वापर केला. ते जॅकेट त्यांचं आवडीचं होतं. मात्र, पेहराव करण्याआधी त्याची योग्य ती तपासणी केली जात होती. राष्ट्रपतीपदाच्या दोन वेळच्या कार्यकाळात व्हाइट हाउसमध्ये बराक ओबामा शक्यतो तेच जॅकेट वापरायचे असं मिशेल ओबामा यांनी सांगितलं.   
 
अॅपल्स वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्समध्ये बोलताना मिशेल यांनी हा खुलासा केला आहे. ""सध्या नागरीक मी वापरलेले बूट, ब्रेसलेट, नेकलेसचे फोटो घेत आहेत, मी कोणत्या ब्रँडच्या चप्पला वापरते, मी कोणत्या अ‍ॅक्सेसरीज घालते याबद्दल अनेकदा फॅशन मॅगझिनमध्ये छापून येतं. कार्यक्रमाला आमचे शेकडोंनी फोटोही छापून आलेत. पण या कालावधीत ओबामा हे सगळीकडे एकच कोट घालून फिरतात हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. हे चुकीचं आहे, आपण  फ्रेड एस्टर आणि जिंजर रोजर्सच्या बाबत बोलतो मात्र, आम्ही काय करतो याबाबत कोणी काही बोलत नाही असं  मिशेल ओबामा म्हणाल्या.

10 मिनिटात व्हायची तयारी- 
कोणत्याही कार्यक्रमासाठी बराक यांची 10 मिनिटात  तयारी व्हायची. जेव्हाही मी त्यांना कोणत्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला सांगायची त्यावर मी तयार आहे...10 मिनिटात मी तयार होईल असंच उत्तर ते द्यायचे असं मिशेल म्हणाल्या. 

Web Title: Oh! Barack Obama, the wife's disclosure, was using a single suit for 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.