अरे बापरे ! शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये सापडला मृतदेह

By Admin | Published: June 4, 2016 06:30 PM2016-06-04T18:30:22+5:302016-06-04T18:30:22+5:30

अमेरिकेत शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Oh dear! The bodies found in the frozers bought from Sheja-i | अरे बापरे ! शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये सापडला मृतदेह

अरे बापरे ! शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये सापडला मृतदेह

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
वॉशिंग्टन, दि. 04 - अमेरिकेत शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नॉर्थ कॅरोलिना येथे राहणा-या एका महिलेने आपल्या शेजा-याकडून 2000 रुपयांमध्ये हा फ्रिजर विकत घेतला होता. घरी आल्यानंतर फ्रिजर उघडून पाहिलं असता धक्काच बसला, कारण त्यामध्ये मृतदेहाचे तुकडे होते. महिलेने तात्काळ 911 क्रमांवर फोन करुन पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. 
 
'मी जेव्हा मृतदेहाचे तुकडे पाहिले मला धक्काच बसला, मी घरातून पळत बाहेर आले आणि पोलिसांना फोन केला', असं महिलेने सांगितलं आहे. मी फ्रिजर विकत घेतल्यानंतर घरी आणला होता. मात्र शेजा-यांनी तो लगेच उघडू नका असं सांगितलं होतं. आपल्या प्रोजेक्टचा हा भाग असल्याचं ते बोलले होते. फ्रिजरमधील सामान घेऊन जाण्यासाठी कोणीच आलं नाही त्यामुळे मी तो उघडून पाहिल्याची माहिती महिलेने दिली आहे. 
 
फ्रिजरमध्ये मृतदेहाचे तुकडे असल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. हा मृतदेह शेजा-याच्या वृद्ध आईचा असावा अशी शंका फ्रिजर विकत घेतलेल्या महिलेने व्यक्त केली आहे. मी 2000 रुपयांमध्ये हा फ्रिजर विकत घेतला, कोणी असं कसं काय करु शकत ? आपल्या आईचा मृतदेह फ्रिजरमध्ये कसा काय ठेवला जाऊ शकतो ? अस सांगताना महिला आश्चर्य व्यक्त करत आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. 
 

Web Title: Oh dear! The bodies found in the frozers bought from Sheja-i

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.