Shocking! १४ कोटींची लॉटरी जिंकल्यावर ९ महिन्यांनी पतीने पत्नी-मुलीची केली हत्या, नंतर केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 06:57 PM2021-08-09T18:57:47+5:302021-08-09T19:17:52+5:30
'डेलीमेल' च्या रिपोर्टनुसार, ४२ वर्षीय जॉन डोनाटोने आधी ३१ वर्षीय आपल्या पत्नी टिफनी हिल आणि २३ महिन्याची मुलगी लीनवर गोळी झाडून त्यांची हत्या केली.
अमेरिकेतील ओक्लाहोमामधून (Oklahoma) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आधी आपल्या पत्नी आणि नंतर २३ महिन्यांच्या मुलीची हत्या (Man kills wife and Daughter) केली. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेवेळी तीन इतरही मुलं घरात होती. पण त्यांना काही नुकसान पोहोचवलं नाही. काही लोकांचं मत आहे की, कपलमध्ये १४.४ कोटी रूपयांच्या लॉटरीवरून वाद सुरू होता.
'डेलीमेल' च्या रिपोर्टनुसार, ४२ वर्षीय जॉन डोनाटोने आधी ३१ वर्षीय आपल्या पत्नी टिफनी हिल आणि २३ महिन्याची मुलगी लीनवर गोळी झाडून त्यांची हत्या केली. नंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं की, ही घटना ३० जुलैला सायंकाळी घडली.
ओक्लाहोमाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गोळी लागल्यावर २३ महिन्यांची लीन जिवंत होती. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण नंतर हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.
ओक्लाहोमा येथे राहणारी टिफनी हिलला ९ महिन्यांआधी १.४ मिलियन पाउंड म्हणजे साधारण १४.४ कोटी रूपयांची लॉटरी लागली होती. काही लोक म्हणाले की, कपलमध्ये लॉटरीच्या पैशांवरून वाद सुरू होता.
परिवाराची वकिल थेरेसा मॅक्गीने सांगितलं की, 'कपलमध्ये लॉटरीवरून वाद सुरू होता. पण आपल्याकडे याबाबतचं सत्य जाणून घेण्याचा कोणताही पर्याय नसेल. पण मला माहीत आहे की, त्यांच्यात पैसा संघर्षाचं कारण ठरला. त्या म्हणाल्या की, टिफनी काही दिवसांपूर्वी आपल्या पतीला सोडणार होती.
आता टिफनी हिलच्या परिवाराने सांगितलं की, आता आमची इच्छा आहे की, इतर कौटुंबिक हिंसा पीडित तिच्या दु:खद मृत्यूतून शिकले पाहिजे. परिवाराने जिवंत वाचलेल्या ३ मुलांसाठी एक GoFundMe कॅम्पेन सुरू केलं आहे.