जपानमध्ये पुराने हाहाकार
By admin | Published: September 12, 2015 02:54 AM2015-09-12T02:54:14+5:302015-09-12T02:54:14+5:30
जपानमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत एक लाख नागरिकांनी पुरामुळे स्थलांतर केले आहे. जपानमधील मागील ६० वर्षांतील सर्वाधिक भीषण पूर असल्याचे
जोसो : जपानमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत एक लाख नागरिकांनी पुरामुळे स्थलांतर केले आहे.
जपानमधील मागील ६० वर्षांतील सर्वाधिक भीषण पूर असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांच्या मदतीसाठी ५१ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. पुरात दोन महिलांचा मृत्यू झाला असून आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. २५ जण बेपत्ता असून सरकारने मदकार्य सुरू केले आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, मुसळधार पावसाने किनुगावा नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक तडाखा जोसो या शहराला बसला असून अनेक नागरिक पुरापासून बचावासाठी घराच्या छतावर थांबले आहेत.
या शहरातील ३२ कि. मी. परिसराला पुराचा फटका बसला असून ६५ हजार लोकसंख्येच्या या शहरातील ६५०० घरे पुराच्या
पाण्याने घेरली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे टोकियो शहराच्या नजीक एका नदीला आलेल्या पुरात ७०० नागरिक अडकले असून ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. (वृत्तसंस्था)