सर्वात वृद्ध व्यक्तीचे ११३ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 05:55 AM2019-01-21T05:55:01+5:302019-01-21T05:55:15+5:30
‘जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसाझो नोनाका या जपानी नागरिकाचे रविवारी वयाच्या ११३ व्या वर्षी निधन झाले.
टोकियो : ‘जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसाझो नोनाका या जपानी नागरिकाचे रविवारी वयाच्या ११३ व्या वर्षी निधन झाले. स्पेनचे फ्रान्सिस्को न्युनेज आॅलिव्हेरा यांचे गेल्या वर्षी निधन झाल्यानंतर ‘गिनीज बुक’ने नोनाका हे जगातील सर्वात वृद्ध हयात व्यक्ती असल्याचे जाहीर केले होते.
आजोबांच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला. काल त्यांना जरा अस्वस्थ वाटू लागले व कुटुंबाला जराही तसदी न देता आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांची नात युको हिने सांगितले. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडला त्याच्या काही महिने आधी म्हणजे सन १९०५ मध्ये मसाझो यांचा जन्म झाला होता.