CoronaVirus: बापरे! अमेरिकेत दिवसात 10000 नवे रुग्ण, 150 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:15 PM2020-03-25T15:15:50+5:302020-03-25T15:16:41+5:30

अमेरिकेमध्ये लॉकडाऊन केल्याने लाखो लोक घरातच बंद झाले आहेत. एका दिवसात अमेरिकेमध्ये १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याच्या या वाढत्या आकड्यामुळे अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून चीनविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

OMG! 10,000 new patients of Coronavirus, 150 deaths in a day America hrb | CoronaVirus: बापरे! अमेरिकेत दिवसात 10000 नवे रुग्ण, 150 जणांचा मृत्यू

CoronaVirus: बापरे! अमेरिकेत दिवसात 10000 नवे रुग्ण, 150 जणांचा मृत्यू

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसने कहर मांडला असून लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ एप्रिलला नवीन वर्षापर्यंत पुन्हा जोमाने सुरु होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेमध्ये कोरोनाने रौद्ररूप घेतले असून एका दिवसात तब्बल १०००० नवे रुग्ण सापडले आहेत. 


अमेरिकेमध्ये लॉकडाऊन केल्याने लाखो लोक घरातच बंद झाले आहेत. एका दिवसात अमेरिकेमध्ये १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याच्या या वाढत्या आकड्यामुळे अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून चीनविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी अमेरिकेने अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेसह सशस्त्र सैनिकांनाही रस्त्यावर उतरविले आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५००० नवीन रुग्ण सापडले आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २५००० हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर २१० जणांचा मृत्यू झाला आहे. 


Covid-19 वर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाईट वर्ल्डोमीटरनुसार मंगळवारी दिवसभरात अमेरिकेमध्ये १०००० रुग्ण सापडले आहेत. यामध्ये संक्रमितांची संख्या ५४००० वर जाऊन पोहोचली आहे. तर एकाच दिवशी १५० जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या ७०० वर पोहोचली आहे. 


ट्रम्प यांनी सांगितले की, प्रत्येकाने सोशल डिस्टंस ठेवावा. मोठ्या सभा घेऊ नयेत, हात धुवा आणि अन्य बाबींपासून वाचवा. आपण अदृष्य शत्रूसोबत लढत आहेत. ही ऐतिहासिक लढाई आहे. तिच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. येत्या ईस्टरपर्यंत सर्वकाही ठीक होईल. हे देशासाठी चांगलेच असले, सर्वजण चांगले काम करत आहेत. ईस्टर कोरोनासाठी डेडलाईन आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Web Title: OMG! 10,000 new patients of Coronavirus, 150 deaths in a day America hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.