OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 10:51 AM2020-08-12T10:51:24+5:302020-08-12T10:53:47+5:30

 न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनीच याची घोषणा केली आहे. मंगळवारी त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलंडच्या एका घरातील चार सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत.

OMG! Corona Returned back in New Zealand; 4 new patients after 102 days | OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

Next

कोरोना महामारीवर विजय मिळविल्यानंतर 100 दिवस एकही कोरोना पेशंट न सापडल्याने जगभरात न्युझीलंडचा स्तुती होऊ लागली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांनीच न्युझीलंडवर पुन्हा कोरोनाचे संकट दाटले असून ऑकलंडमध्ये चार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.


 न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनीच याची घोषणा केली आहे. मंगळवारी त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलंडच्या एका घरातील चार सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना कोरोना कसा झाला याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. देशात 102 दिवसांनंतर स्थानिक संक्रमन झाले आहे. 


पंतप्रधान म्हणाल्या, न्युझीलंडचे सर्वात मोठे शहर ऑकलंड बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. तसेच बार आणि अन्य अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. 
तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. याद्वारे आम्ही त्या कुटुंबाला कोरोना एवढ्या कालावधीनंतर कसा झाला याचा शोध घेणार आहोत. ही माहिती गोळा करणे खूप कठीण आहे, हे माहिती असल्याचे त्या म्हणाल्या. 


पीएम जेसिंडा यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडतील याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यासाठी आम्ही तयारी केली होती. ऑकलंडमध्ये प्रवासावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. जे लोक तिथे राहतात आणि घरी जात आहेत त्यांना अडविले जाणार नाही. शुक्रवारपासून लॉकडाऊन वाढविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात समारंभांना 100 व्यक्तींना परवानगी दिली जाईल. त्यांना सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

Web Title: OMG! Corona Returned back in New Zealand; 4 new patients after 102 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.