बापरे...या देशात गाढवांसाठी आहे वेगळे हॉस्पिटल; वाचा काय आहे कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 06:45 PM2018-12-19T18:45:53+5:302018-12-19T18:46:41+5:30

सध्या हा देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशात 5.3 दशलक्ष गाढवे आहेत.

OMG... a separate hospital for donkeys in this country; Read what's the reason ... | बापरे...या देशात गाढवांसाठी आहे वेगळे हॉस्पिटल; वाचा काय आहे कारण... 

बापरे...या देशात गाढवांसाठी आहे वेगळे हॉस्पिटल; वाचा काय आहे कारण... 

Next

नवी दिल्ली : पाकिस्तान नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असतोच. यंदाच्या एप्रिलमध्येही हा देश चर्चेत आला होता. याचे कारण तेथील गाढव होते. होय, पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या हा देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशात 5.3 दशलक्ष गाढवे आहेत.


पंजाब लाईव्हस्टोक डिपार्टमेंटच्या आकड्यांनुसार एकट्या लाहोरमध्येच गाढवांची संख्या 41 हजार आहे. त्यांची वाढती संख्या पाहून पाकिस्तान सरकारने केवळ गाढवांसाठी हॉसि्पटल उघडले आहे. येथे त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात. पाकिस्तानी मिडीयानुसार गाढवांचा व्यापार करणाऱ्या लोकांना यामुळे मोठा फायदा होत आहे. एवढेच नाही अख्ख्या देशातच गाढवांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.


गाढवांच्या प्रजातीनुसार त्यांच्या किंमती ठरतात. 35 हजारपासून 55 हजार रुपयांपर्यंत या किंमती आहेत. गाढवांची खरेदी-विक्री करून येथील व्यापारी दिवसाला 800 रुपये मिळवतात. पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांकावर इथिओपिया हे देश आहेत.


2016 च्या आकड्यानुसार पाकिस्तानात 51 लाख गाढवे होती. जी 2017 मध्ये वाढून 52 लाख झाली आहेत. 2018 मध्ये यामध्ये तब्बल 1 लाखांनी वाढ झाली आहे.

Web Title: OMG... a separate hospital for donkeys in this country; Read what's the reason ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.