OMG! शाओमीने 4G स्मार्टफोनचे उत्पादन केले बंद; जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 08:10 PM2020-05-27T20:10:41+5:302020-05-27T20:11:48+5:30
कंपनीने नुकताच रेडमी १० X लाँच केला आहे. तसेच रेडमी १० X प्रोदेखील बाजारात आणला आहे. दोन्ही फोनमधील स्पेसिफिकेशन्स एकसारखेच आहेत.
चीनची आघाडीची स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi ने मोठा निर्णय घेतला आहे. शाओमीची उपकंपनी Redmi ने देखील २०२० मध्ये मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोनची मॉडेल बाजारात आणली आहेत. मात्र, यापुढे शाओमी 4G स्मार्टफोन बनविणार नाहीय. वाचून शॉक झालात ना. हो, हा निर्णय केवळ चीनसाठी घेण्यात आला आहे. अन्य देशांमध्ये शाओमी 4G स्मार्टफोन विकणार आहे.
चीनमध्ये ५ जी तंत्रज्ञानाचा वापर बऱ्यापैकी होऊ लागला आहे. यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सीईओनीच याची माहिती दिली आहे. शाओमी आता ६ जीच्या तयारीला लागली आहे. तसेच सॅटेलाईट इंटरनेट तंत्रज्ञानही विकसित केले जात आहे. एका न्यूज एजन्सीला त्यांनी मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी याचा खुलासा केला. 5G कनेक्टिव्हीटीमुळे 4K/8K व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अॅप्स, क्लाऊड गेमिंग आणि ऑटो पायलटसारख्या क्षेत्रामध्ये क्रांती येत आहे. यामुळे कंपनी ५ जी चे फोन बाजारात उतरवत आहे.
कंपनीने नुकताच रेडमी १० X लाँच केला आहे. तसेच रेडमी १० X प्रोदेखील बाजारात आणला आहे. दोन्ही फोनमधील स्पेसिफिकेशन्स एकसारखेच आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.57 इंचाचा अमोल्ड फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोनमधील चिपसेट हा उच्च वेगाने इंटरनेट वापरासाठीचा आहे. यामुळे यामध्ये ५ जी सेवा वापरता येणार आहे. भारतातही काही महिन्यांत ५ जी सेवा सुरु होण्याचे संकेत आहेत. २०२१ च्या सुरुवातीला ही सेवा लाँच होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय बाजारातही शाओमीसह मोटरोलाने ५ जी स्मार्टफोन लाँच केले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
VIP व्यक्तीचा बकरा चोरीला गेला; कोरोनाचा बंदोबस्त सोडून पोलीस लागले कामाला
कोरोनाच्या संकटातही पीपीई किट खरेदीत घोटाळा; हिमाचल भाजपा प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा
लॉटरीच लागली! Work from Home कर्मचाऱ्याला 'ही' कंपनी ७५००० रुपये असेच देणार
तेरी मेहरबानिया! कोरोनामुळे मालक गमावला; तीन महिने झाले कुत्रा हॉस्पिटलमध्ये वाट पाहतोय
SBI चा ठेवीदारांना मोठा धक्का; मे महिन्यातच दोनदा व्याजदर घटविले