CoronaVirus News: ...तर 'त्या' रुग्णाच्या शरीरात सुपर व्हेरिएंट तयार होणार; डॉक्टरांनी सांगितला पुढचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 01:36 PM2021-12-15T13:36:31+5:302021-12-15T13:38:17+5:30

CoronaVirus News: ओमायक्रॉनचं संकट गंभीर होत असताना डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

omicron covid 19 variant delta combine worse modern dr paul burton | CoronaVirus News: ...तर 'त्या' रुग्णाच्या शरीरात सुपर व्हेरिएंट तयार होणार; डॉक्टरांनी सांगितला पुढचा धोका

CoronaVirus News: ...तर 'त्या' रुग्णाच्या शरीरात सुपर व्हेरिएंट तयार होणार; डॉक्टरांनी सांगितला पुढचा धोका

googlenewsNext

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगभरात धुमाकूळ घालत आहे. जगभरातील ६० हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. देशात आतापर्यंत ६१ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि शास्त्रज्ञांनी व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यातच आता मॉडर्ना लसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पॉल बर्टन यांनी ओमायक्रॉनबद्दलचा पुढील धोका सांगितला आहे.

एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटची एकाचवेळी लागण झाल्यास नवा सुपर व्हेरिएंट तयार होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा डॉ. पॉल बर्टन यांनी दिला. कोरोनाची लागण झाल्यानंतर सामान्यपणे एकावेळी एकच म्युटेशन होतं. पण दुर्मिळ प्रकरणांमध्ये दोन स्ट्रेन एकाचवेळी हल्ला करू शकतात. दोन स्ट्रेन्सनी एकाच कोशिकेला संक्रमित केल्यास ते डीएनएची अदलाबदल करू शकतात. या स्थितीत विषाणूचा नवा व्हेरिएंट तयार होऊ शकतो. ब्रिटनमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत हा धोका वाढला आहे, असं बर्टन यांनी सांगितलं.

दोन स्ट्रेन एक धोकादायक व्हेरिएंट जन्माला घालू शकतात. डीएनएच्या अदलाबदलीतून हे नक्कीच शक्य आहे, असं डॉ. पॉल विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीला संबोधित करताना म्हणाले. दुर्मिळ स्थितीत विषाणूचं हे रुप समोर येऊ शकतं. आतापर्यंत अशा प्रकारे कोरोनाचे केवळ तीन स्ट्रेन तयार झाल्याची नोंद आहे. बऱ्याचदा विषाणू स्वत:चं म्युटेट होतो आणि नवा व्हेरिएंट तयार होतो.

दोन आठवड्यांत लंडनमधील परिस्थिती बदलली आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगानं वाढला आहे. नव्या वर्षाचं आगमन होईपर्यंत तो पूर्णपणे पसरलेला असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बऱ्याचदा एका विशिष्ट भागात एका व्हेरिएंटचा प्रादुर्भाव पसरतो. हजारो लोकांना त्या स्ट्रेनची लागण होते. त्यावेळी दोन स्ट्रेनची लागण होण्याची शक्यता कमी असते, अशी माहिती डॉ. पॉल यांनी दिली.
 

Web Title: omicron covid 19 variant delta combine worse modern dr paul burton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.