Omicron Variant: ओमायक्रॉनसमोर बूस्टर डोस फेल? लसीचे कवच भेदून शरीरात शिरकाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 05:54 AM2021-12-11T05:54:29+5:302021-12-11T05:55:00+5:30
जगभरात अनेक ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाली होती. दक्षिण अफ्रिकेत तसे अनेक रुग्णही आढळले आहेत.
लसीचे दोन्ही डोस पूर्ण केल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जगभरात बूस्टर डोस देण्याबाबत चर्चा जोरात सुरू आहे. काही देशांनी बूस्टर डोस देणेही सुरू केले आहे. मात्र, कोरोनाचा नवा विषाणू या बूस्टरने निर्माण केलेले कवच भेदून शरीरात जागा मिळवत असल्याचे पुढे आले आहे. बूस्टर डोस घेलेल्याला एका व्यक्तिलाच सिंगापूरमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
५९ देशांमध्ये पसरला ओमायक्रॉन
दक्षिण अफ्रिकेत २४ नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ५९ देशांमध्ये त्याचा शिरकाव झाला आहे.
कवचकुंडले भेदून संसर्ग?
जगभरात अनेक ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाली होती. दक्षिण अफ्रिकेत तसे अनेक रुग्णही आढळले आहेत. पहिल्यांदाच सिंगापूरमध्ये बूस्टर डोस घेतलेल्या व्यक्तिलाही ओमायक्रॉन झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे लसीचे कवच भेदण्यात सध्यातरी ओमायक्रॉन यशस्वी होत असल्याचे दिसते.
भारतात किती रुग्ण?
भारतात आतापर्यंत २६ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली असल्याचे निदान झाले आहे. या सर्वांमध्ये हलक्या स्र्वरुपाची लक्षणे आढळली आहेत.
संशोधन काय सांगते?
याबद्दल नुकतेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार लस घेतल्यानंतर निर्माण झालेली प्रतिकारशक्ती २० टक्क्यांहून अधिक शिल्लक असेल तर विषाणूची बाधा होण्याची शक्यता कमी असते.