३८ देशांमध्ये ओमायक्राॅनने पसरले पाय; आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्ण, भीती मात्र डेल्टाचीच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 04:58 AM2021-12-05T04:58:53+5:302021-12-05T04:59:20+5:30
कॅनडामध्ये नव्या विषाणूचे १५ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कॅनडामध्ये ५० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डाेस देण्याचा सल्ला देण्यात आला आहे
वाॅशिंग्टन : अतिशय वेगाने पसरणाऱ्या ओमायक्राॅनचा आतापर्यंत ३८ देशांमध्ये शिरकाव झाला आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेपाठाेपाठ ब्रिटन, घाना आणि नेदरलॅंड या देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतही सहा राज्यांमध्ये नवा विषाणू पाय पसरत आहे. असे असले तरी थंडीच्या दिवसांमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये डेल्टाचीच भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कॅनडामध्ये नव्या विषाणूचे १५ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कॅनडामध्ये ५० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डाेस देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय सिंगापूर, फ्रान्स आणि मलेशियामध्येही ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत काेराेनाच्या ओमायक्राॅन व्हेरिएंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील आणखी सहा राज्यांमध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यूजर्सी, मेरीलॅंड, मिसूरी, नेब्रास्का, पेनसिल्वेनिया आणि उताह या राज्यांनी ओमायक्राॅनचा रुग्ण आढळल्याची माहिती दिली. नेब्रास्का येथे ६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी केवळ एकाचेच लसीकरण झाले हाेते. तसेच काेणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. उताह येथील रुग्णाला ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्या जनुकीय तपासणीनंतर उघडकीस आले. मेरिलॅंडमध्ये ३, पेनसिल्वेनिया, आणि न्यूजर्सीमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
डेल्टाचाच जास्त धाेका
काेणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. ओमायक्राॅनची चिंता असली तरीही वाढत्या थंडीमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा जास्त धाेका असल्याचे अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
मदुराईत लोकांना लसीची किमान एक मात्रा...
दक्षिण तामिळनाडूतील मदुराईत राहणाऱ्यांना कोविड-१९ विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीची किमान एक मात्रा (डोस) घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक आठवड्याचा वेळ दिला असून, त्यानंतर लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्रवेशाला बंदी असेल. ही घोषणा जिल्हाधिकारी अनिश शेखर यांनी केली. ते म्हणाले, “लस घेतल्याचे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल त्यांनाच सार्वजनिक ठिकाणी येण्यास मुभा असेल.