नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रुडोंनी अमेरिकेला दिला इशारा, म्हणाले, "कॅनडा मजबूत आणि स्वतंत्र..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:04 IST2025-01-01T11:02:38+5:302025-01-01T11:04:23+5:30
काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकन राज्य म्हटले होते. आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ट्रुडो यांनी ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिले असून कॅनडा हा स्वतंत्र देश असल्याचे म्हटले आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रुडोंनी अमेरिकेला दिला इशारा, म्हणाले, "कॅनडा मजबूत आणि स्वतंत्र..."
जगभरात नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. कॅनडानेही नव्या वर्षाचे स्वागत केले. कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांनी नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकन राज्य म्हटले आहे. यावर आता ट्रम्प यांना ट्रुडो यांनी प्रत्युत्तर दिले असून कॅनडा हा स्वतंत्र देश असल्याचे म्हटले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एक्सवर या सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले, "देशभर काउंटडाउन सुरू झाले आहे." तुम्ही देशात असाल किंवा परदेशात, २०२५ तुमच्यासाठी नवीन आव्हाने आणि संधी घेऊन येईल, परंतु एक गोष्ट आम्हाला माहित आहे की हा देश मजबूत आणि स्वतंत्र आहे आणि आम्हाला ते घर म्हणण्यात अभिमान आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा कॅनडा, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
'ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत, त्या दिवशीपासून ते कॅनडाबाबत विधान करत आहेत. काही दिवसापूर्वी ट्रुडो अमेरिकेत गेले होते आणि त्यांनी ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानी मार-ए-लागो येथे डिनर केले होते, तेव्हा ट्रम्प यांनी या डिनरचा फोटो शेअर केला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना ट्रम्प यांनी ट्रुडो यांना पंतप्रधान नव्हे तर कॅनडाचे गव्हर्नर म्हटले होते.
कॅनडा हे अमेरिकेचे ५१ वे राज्य बनले पाहिजे, अशी ऑफर ट्रुडो यांना डिनरदरम्यान ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, ही ऑफर गंमतीने देण्यात आली.
ट्रम्प यांनी कॅनडाला दिली होती ऑफर
ट्रम्प पोस्टमध्ये म्हटले होते की, जर कॅनडा हे युनायटेड स्टेट्सचे ५१ वे राज्य बनले तर त्यांच्या करात ६० टक्क्यांहून अधिक कपात केली जाईल, त्यांचा व्यवसाय ताबडतोब दुप्पट होईल आणि त्यांना अमेरिकेचे लष्करी संरक्षण देखील मिळेल. जे जगातील इतर कोणत्याही देशाला मिळणार नाही, असंही या पोस्टमध्ये म्हटले होते.