एकेकाळी होता प्रसिद्ध न्यूज अँकर, आता उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर विकतोय खाद्यपदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 07:25 PM2022-06-17T19:25:12+5:302022-06-17T19:26:13+5:30

Afganistan: रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या प्रसिद्ध टीव्ही अँकरचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत, त्याला भारतात येण्याचे आवाहन केले जात आहे.

Once a famous Afagani news anchor, now selling food on the streets | एकेकाळी होता प्रसिद्ध न्यूज अँकर, आता उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर विकतोय खाद्यपदार्थ

एकेकाळी होता प्रसिद्ध न्यूज अँकर, आता उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर विकतोय खाद्यपदार्थ

Next

काबूल:अफगाणिस्तानवरतालिबानच्या ताब्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली असून, घर भागवण्यासाठी लोकांना मिळेल ते काम करावे लागत आहे. यातच आता एका प्रसिद्ध टीव्ही पत्रकाराची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, कुटुंबाचे पोट भागवण्यासाठी त्याला रस्त्यावर खाद्यपदार्थ विकावे लागत आहेत. 

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांच्या सरकारमध्ये काम केलेले कबीर हकमाली यांनी ट्विट करुन या पत्रकाराची माहिती दिली आहे. कबीर कमाली याने तीन फोटोही शेअर केले आहेत. एकामध्ये तो पत्रकार स्टुडिओमध्ये अँकरच्या पोजमध्ये बसलेला दिसत आहे. दुसऱ्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विकताना दिसत आहे. 


कबीर हकमाली यांनी ट्विट केले की- "तालिबानी राजवटीत अफगाणिस्तानमधील पत्रकारांचे जीवन. मुसा मोहम्मदी यांनी अनेक वर्षे अँकर आणि रिपोर्टर म्हणून वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलमध्ये काम केले. आता त्यांच्याकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीही पैसे नाहीत. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकून तो पैसे कमावतो. लोकशाही संपल्यापासून अफगाण जनता अभूतपूर्व गरिबीचा सामना करत आहे."

पोस्टवर अनेक कमेंट्स
या पोस्टवर अनेक भारतीय लोकांनीही कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले - 'भारताकडून प्रेम आणि काळजी... आशा आहे की भारत सरकार या लोकांना मदत करेल.' दुसर्‍याने लिहिले - 'भारतात या, इथे अधिक संधी आहेत.' याआधी कबीरने ट्विट करून आणखी एका पत्रकाराचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी एकराम इस्मतीसोबत घडलेला प्रकार सांगितला. 


त्यांनी लिहिले - "हा अफगाण पत्रकार एकराम इस्मती आहे. काबूलच्या पीडी 5 येथून तालिबानने त्याचे अपहरण केले होते. त्याला मारहाण आणि अपमानित करण्यात आले. कारण, त्याने जीन्स घातली होती आणि त्याची दाढी केली मुंडली होती. बेकायदेशीरपणे एकरामचा फोन तपासण्यात आला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली."

Web Title: Once a famous Afagani news anchor, now selling food on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.