इंग्लंडमधील सस्तन प्राण्यांच्या दर पाच प्रजातींमागे एक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 05:15 PM2018-06-13T17:15:00+5:302018-06-13T17:17:39+5:30

भूपृष्ठावर राहाणाऱ्या 58 सस्तन प्रजातींच्या 15 लाख जैविक पुराव्यांचा विचार करुन हा संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे.

One in five UK mammals at risk of extinction | इंग्लंडमधील सस्तन प्राण्यांच्या दर पाच प्रजातींमागे एक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

इंग्लंडमधील सस्तन प्राण्यांच्या दर पाच प्रजातींमागे एक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

googlenewsNext

लंडन- रेड स्क्विरल (तांबडी खार), वाइल्डकॅट (रानमांजर), ग्रे लाँग इअर्ड बॅट (वटवाघळाचा एक प्रकार) अशा अनेक प्रजाती इंग्लंडमधून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलामध्ये राहाणाऱ्या सस्तन प्राण्यांपैकी 12 जातींचा समावेश नष्ट होत चाललेल्या प्रजातींच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

इंग्लंडमधील सस्तन प्राण्यांच्या प्रत्येक पाच प्रजातींमागे एक प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे द मॅमल सोसायटी अँड नॅचरल इंग्लंड स्टडी संस्थेने स्पष्ट केले आहे. ग्लोबल वॉर्मिंग, प्राण्यांचा अधिवास नष्ट होणे, किटकनाशकांचा अतिरेकी वापर आणि रोगराई यामुळे या प्रजाती नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. हेजहॉग आणि वॉटर वोल यांच्या संख्येत गेल्या 20 वर्षांमध्ये 70 टक्के इतकी घट झाली आहे. मात्र ऑटर, पाइन मार्टन, पोलकॅट, बॅजर या प्राण्यांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडमधील गेल्या 20 वर्षांमधील सस्तन प्राण्यांचा अभ्यास करून विविध प्रजातींच्या संख्येबाबत हा अहवाल मांडण्यात आला आहे.



भूपृष्ठावर राहाणाऱ्या 58 सस्तन प्रजातींच्या 15 लाख जैविक पुराव्यांचा विचार करुन हा संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे. या प्रजातींची संख्या वाढत आहे की कमी होत आहे, त्यांची भविष्यात किती संख्या असेल असा अनेक शक्यतांचा विचार यामध्ये करण्यात आलेला आहे. वाइल्ड कॅट, ग्रेटर माऊस इअर्ड़ बॅट, ब्लॅक कॅट यांना क्रिटिकली एंडेजर्ड स्पेसिज यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

Web Title: One in five UK mammals at risk of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.