चिकन गुनिया झाल्याचे एक तासात कळणार
By admin | Published: May 13, 2015 10:42 PM2015-05-13T22:42:20+5:302015-05-13T22:42:20+5:30
भारतात थैमान घालणाऱ्या चिकन गुनियावर अमेरिकन संशोधकांनी एक नवे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने
वॉशिंग्टन : भारतात थैमान घालणाऱ्या चिकन गुनियावर अमेरिकन संशोधकांनी एक नवे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने चिकन गुनिया झाला आहे काय याची माहिती एका तासात होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
जर्नल आॅफ मेडिकल अँटमोलॉजी या नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार अमेरिकी लष्कराच्या आरोग्य संशोधन संस्थेने चिकन गुनिया झाला आहे काय? हे जाणून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचणीच्या पद्धतीत फरक केला आहे. नव्या चाचणीमुळे डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरात चिकन गुनियासाठी कारणीभूत ठरणारा सीएचआयकेव्ही हा विषाणू आहे काय हे लगेचच कळू शकेल.
नवे उपकरण लवकरच बाजारात येईल व त्यानंतर चिकन गुनिया झाला आहे काय, हे कळण्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. एका तासात चिकन गुनियाचा विषाणू शरीरात आहे काय हे समजू शकेल.