एका विमानाची दुसऱ्याला धडक; आग लागूनही ३७९ प्रवासी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 07:43 AM2024-01-03T07:43:11+5:302024-01-03T07:43:41+5:30
तटरक्षक दलाच्या विमानातील वैमानिक बचावला; पण त्यातील अन्य पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथील हानेडा विमानतळावर मंगळवारी एका प्रवासीविमानाने उतरल्यानंतर तटरक्षक दलाच्या विमानाला धडक दिली. त्यामुळे प्रवासी विमानाने पेट घेतला. मात्र या विमानात असलेले सर्व ३७९ प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या विमानातील वैमानिक बचावला; पण त्यातील अन्य पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जपानच्या शिन चिटोसेवरून टोकियोला आलेल्या एअरबस ए- ३५० या विमानाने लँडिंग करताना तटरक्षक दलाच्या विमानाला धडक दिली. त्यानंतर विमानाच्या पंखांना आग लागली. घटनास्थळी दाखल झालेल्या बचावपथकाने प्रवाशांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले.
विमानानातील सर्व प्रवाशांची सुटका करण्यात यश आल्यानंतर संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.