फक्त आवाजावर हॅक केला जाऊ शकतो तुमचा स्मार्टफोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 02:50 PM2017-03-15T14:50:39+5:302017-03-15T14:50:39+5:30
संशोधकांनी अशा एका त्रुटीची माहिती मिळवली आहे ज्यामध्ये डिव्हाइस फक्त अॅक्सेलेरोमीटरच्या माध्यमातून हॅक केलं जाऊ शकतं
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कैरलाइनामधील संगणक सुरक्षा संशोधकांनी अशा एका त्रुटीची माहिती मिळवली आहे ज्यामध्ये डिव्हाइस फक्त अॅक्सेलेरोमीटरच्या माध्यमातून हॅक केलं जाऊ शकतं. अॅक्सेलेरोमीटर्स स्मार्टफोन, फिटनेस मॉनिटर्स आणि वाहनांमध्ये वापरलं जात. अॅक्सेलेरोमीटरच्या मदतीने कोणत्याही फिरत्या किंवा वायब्रेटिंग वस्तूचा प्रवेग मापला जातो.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फिटबिट फिटनेस मॉनिटरमध्ये जाणुनबुजून चुकीच्या स्टेप्सची नोंद केली. यानंतर अॅक्सेलेरोमीटरला कंट्रोल करण्यासाठी स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये एक संशयित म्यूझिक फाईल प्ले केली. यामध्ये त्यांना स्मार्टफोन अवलंबून असणा-या सॉफ्टवेअरसोबत छेडछाड करण्याची संधी मिळाली. संशोधकांनी याचप्रमाणे रिमोट कंट्रोलवरील खेळण्याची गाडीला नियंत्रित करणा-या अॅपसोबतही छेडछाड करण्यात यश मिळवलं.
संशोधक केविन फ्यू यांनी सांगितलं आहे की, 'काही शब्द टाकून कमांड एंटर केल्यानंतर फोन शटडाऊन केला जाऊ शकतो. याला म्यूझिकल व्हायरसही म्हणू शकतो'.
संशोधकांनी पाच वेगवेगळ्या कंपन्यांची चीप वापरणा-या 20 कमर्शिअल ब्रॅण्ड्सच्या अर्धाहून जास्त स्मार्टफोनमध्ये हा दोष असल्याचं सांगितलं आहे. सध्याच्या घडीला अनेक कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग कार आणि ट्रॅक वैगेरे बनवण्यात व्यस्त आहेत. अशावेळी जर एखादी त्रुटी राहिली तर लांब बसून एखाद्याच्या वाहनाचा ताबा घेऊन नियंत्रित केलं जाऊ शकतं. 'ही अत्यंत गंभीर चूक नसली तरी यामुळे सायबर सेक्यूरिटीमध्ये किती मोठी त्रुटी आहे हे समोर येत असल्याचं', संशोधकांनी सांगितलं आहे.