जगातील सर्वात लांब आणि खोल बोगदा झाला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2016 08:21 PM2016-06-01T20:21:27+5:302016-06-02T00:11:50+5:30
जगातील सर्वात लांब आणि खोल रेल्वे बोगद्याचे स्वीत्झर्लंडमध्ये आज उद्घाटन झालं
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 1 - जगातील सर्वात लांब आणि खोल रेल्वे बोगद्याचे स्वीत्झर्लंडमध्ये आज उद्घाटन झालं. विशेष म्हणजे 57 किमी लांबीचा हा द्विमार्गी बोगदा असून, त्या बोगद्याचं काम जवळपास 17 वर्षांपासून सुरू होते. या बोगद्याला गोथार्ड बेस टनेल नाव दिलं आहे. हा बोगदा स्वीस अल्पस् पर्वतराजीच्या खालून जाणार असून, हायस्पीड रेल्वेद्वारे उत्तर आणि दक्षिण युरोपला जोडणार आहे.
गोथार्ड बोगद्यानं जपानमधील 53.9 किमीच्या सेईकन रेल्वे बोगद्यालाही मागे टाकलं आहे. ब्रिटन आणि फ्रान्सला जोडणारा 50.5 किमीचा चॅनल बोगदा तिस-या क्रमाकांवर फेकला गेला आहे. या बोगद्याच्या खोदकामावर 12 अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. तो तयार करावा की नाही, याबाबत स्वीत्झर्लंडने 1992मध्ये सार्वमत घेतले होते. यात लोकांनी बोगद्याच्या बाजूने कौल दिला होता.
हा बोगदा अल्पस् पर्वतराजीच्या पृष्ठभागापासून अडीच कि.मी. खोलीवर असून, खडकांमधून गेलेला आहे. बोगदा तयार करताना अभियंत्यांना विविध 73 प्रकारचे खडक खोदावे किंवा स्फोटाद्वारे फोडावे लागले. यातील काही खडक ग्रेनाईटइतके कठीण, तर काही साखरेइतके मऊ होते. बोगद्याच्या कामादरम्यान नऊ कामगार विविध दुर्घटनांत ठार झाले.