पॅरिसमधील कारवाई संपली, २ दहशतवादी ठार तर ७ अटकेत
By admin | Published: November 18, 2015 10:47 AM2015-11-18T10:47:36+5:302015-11-18T17:15:51+5:30
उत्तर पॅरिसमधअये बुधवारी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई संपली असून दोन दहशतवादी ठार तर ७ जणांना अटक करण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. १८ - उत्तर पॅरिसमधअये बुधवारी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई संपली असून दोन दहशतवादी ठार तर ७ जणांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी पॅरिस पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजांनी हादरले. उत्तर पॅरिसमध्ये पोलिसांनी शोधमोहीम सुरू केले असता काही संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला व चकमक सुरू झाली. अनेक तासांनंतर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर ७ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान तीन पोलिसही जखमी झाल्याचे वृत्त आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी पॅरिसमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १२९ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये पोलिसांनी छापेमारी सुरु केली असून उत्तर पॅरिसमधील सेंड डेनिस येथे पोलिसांची शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान एका इमारतीमध्ये लपलेल्या संशयित दहशतवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली. या गोळीबारात दोघांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. यात एका महिलेने चकमकीदरम्यान स्फोट घडवत स्वतःला संपवले. गोळीबाराच्या आवाजाने पॅरिसमध्ये घबराट निर्माण झाली होती. सेंट डेनिस येथील इमारती पोलिसांनी खाली करायला लावल्या असून परिसराला पोलिसांनी चोहोबाजूंनी वेढा घातला आहे. फ्रान्स सैन्याची तुकडीही घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांनी चकमकीदरम्यान तिघांना अटक केल्याचे वृत्त आहे.