‘एच-१ बी’ नियमांमधील बदलाला सदस्यांचा विरोध , प्रतिभावानांची संख्या कमी होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:25 AM2018-01-06T01:25:43+5:302018-01-06T01:26:15+5:30
एच १ बी व्हिसा नियमात बदल करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूहांनी विरोध केला आहे. या प्रस्तावामुळे अमेरिकेत प्रतिभावान लोकांची संख्या कमी होईल, अशी भीतीही या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
वॉशिंग्टन - एच १ बी व्हिसा नियमात बदल करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूहांनी विरोध केला आहे. या प्रस्तावामुळे अमेरिकेत प्रतिभावान लोकांची संख्या कमी होईल, अशी भीतीही या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
एच १ बी व्हिसा नियमातील प्रस्तावित बदल हा ट्रम्प यांच्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणाचा भाग आहे. याचा एक मसुदा अंतर्गत सुरक्षा विभागाने तयार केला आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेचा हा महत्त्वाचा भाग होता. उच्चशिक्षित विदेशी कर्मचाºयांना नियुक्ती देण्यासाठी अमेरिकी कंपन्यांना या व्हिसाच्या माध्यमातूनच संधी मिळते. ज्या क्षेत्रात अमेरिकी कर्मचाºयांचा अभाव आहे त्या क्षेत्रात विदेशी कर्मचाºयांची नियुक्ती या व्हिसामुळे शक्य आहे.
संबंध बिघडतील
डेमोक्रॅटच्या सदस्य तुलसी गबार्ड म्हणाल्या की, एच १ बी व्हिसाधारकांवर नवे नियम लागू केल्यास अनेक कुटुंबे विभागली जातील. यामुळे भारतासोबतचे संबंध बिघडूही शकतात. या प्रस्तावामुळे ५ ते ७.५ लाख भारतीय एच १ बी व्हिसाधारकांना आपल्या देशात परतावे लागेल.