महिला अँकर्सचा चेहरा झाकण्याला विरोध, पुरुषांनीही लावले मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 09:14 AM2022-05-26T09:14:08+5:302022-05-26T09:14:48+5:30

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकारविरोधात लढा

Opposing the covering of female anchors' faces, men also wore masks | महिला अँकर्सचा चेहरा झाकण्याला विरोध, पुरुषांनीही लावले मास्क

महिला अँकर्सचा चेहरा झाकण्याला विरोध, पुरुषांनीही लावले मास्क

googlenewsNext

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्येमहिला वृत्त निवेदकांच्या समर्थनार्थ तेथील पुरुष सहकारी आता पुढे आले आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्त निवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान त्यांचा चेहरा झाकण्याच्या तालिबान प्रशासनाच्या आदेशाचा निषेध करण्यासाठी अनेक पुरुष सहकाऱ्यांनीही पूर्ण चेहरा झाकून वृत्त निवेदन करण्यास सुरुवात केली आहे. 

महिलांसोबतच पुरुष वृत्त निवेदकदेखील मास्क घालून बातम्या देत असल्याची काही छायाचित्रे टोलो न्यूजने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहेत. तालिबानच्या आदेशाचे पालन न करण्याचे धाडस जरी पुरुष सहकारी दाखवू शकत नसले तरी निषेध म्हणून त्यांनीही चेहरा झाकून बातम्या देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराचा निषेध नोंदवल्याबद्दल अफगाणिस्तानच्या पुरुष वृत्त निवेदकांचे सोशल मीडियावरही खूप कौतुक होत आहे. तालिबानी आदेशाचा निषेध करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रकारही स्वतःचा चेहरा झाकून पाठिंबा देत आहेत. यासाठी सोशल मीडियावर  #FreeHerFace ही मोहीम राबवली जात आहे. अनेक पत्रकार या मोहिमेअंतर्गत ट्विटरवर मास्क घातलेले फोटो टाकून तालिबानच्या आदेशावर टीका करत आहेत. जगभरातून नेटकरीही यावरून संताप व्यक्त करत आहेत. तसेच, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.

मुलींवरील निर्बंधांत वाढ
गेल्या वर्षी अमेरिकेने आपले सैन्य मागे बोलावून घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील लोकनियुक्त हमीद करझई सरकार पदच्युत करून तालिबान राजवट लागू झाली. तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाण महिला आणि तरुण मुलींवरील निर्बंधांमध्ये वाढ होत आहे.

nमे महिन्याच्या सुरुवातीला तालिबानने सार्वजनिक ठिकाणी महिलांनी त्यांचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असावा, असा आदेश दिला. चेहरा झाकून टीव्हीवर येण्याच्या तालिबान प्रशासनाचा आदेश सुरुवातीला काही मोजक्या 
वृत्तवाहिन्यांनी अमलात आणला.
nप्रमुख वाहिन्यांच्या महिला निवेदिकांनी चेहरा न झाकता वृत्त प्रसारित केले. मात्र तालिबानने आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्यानंतर बहुतांश महिला निवेदक त्यांचे चेहरे झाकलेले दिसत आहेत.


 

Web Title: Opposing the covering of female anchors' faces, men also wore masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.