राजकीय देखाव्यासाठीच भारताचा वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टला विरोध- चीन

By admin | Published: May 16, 2017 05:08 PM2017-05-16T17:08:27+5:302017-05-16T17:08:27+5:30

चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टमध्ये भारत सहभागी होत नसल्यानं चीनकडून भारतावर सातत्यानं टीका केली जात आहे

Opposition to India's One Belt One Road Project for Political Scene- China | राजकीय देखाव्यासाठीच भारताचा वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टला विरोध- चीन

राजकीय देखाव्यासाठीच भारताचा वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टला विरोध- चीन

Next
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 16 - चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टमध्ये भारत सहभागी होत नसल्यानं चीनकडून भारतावर सातत्यानं टीका केली जात आहे. वन बेल्ट वन रोड प्रोजेक्टवरून भारत देशांतर्गत राजकीय देखावा करत असल्याची टीका चिनी मीडियानं केली आहे. भारताकडे लक्ष्य खेचण्यासाठीच चीनवर दबाव निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचंही चीन म्हणाला आहे.
 
भारताला वाटते की, तो अधिक सक्रियतेनं द्विपक्षीय संबंधांना आकार देऊ शकतो आणि चीननं भारताच्या हितांकडे अधिक लक्ष्य द्यावं अशी भारताची मनीषा आहे, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून छापून आलं आहे. मात्र दोन देशांमध्ये अशा प्रकारे कधीच संवाद होत नसतो, OBOR प्रोजेक्टला भारताचा विरोध म्हणजे राजकीय देखावा असून, चीनवर दबाव वाढवण्याचा भारताचा उद्देश असल्याचंही या लेखात मांडण्यात आलं आहे. मात्र याचा चीनवर काहीच फरक पडत नाही. जगाच्या प्रगतीतही भारतानं सहभाग न घेतल्यानं काहीच फरक पडणार नाही. 50 अब्ज डॉलरच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC)च्या योजनेवरील स्वतःच्या सार्वभौमत्वामुळेच भारतानं OBOR प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला नाही.
 
चीनचा हा आर्थिक कॉरिडोर पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. जर भारत स्वतःला मोठी शक्ती मानत असेल तर भारतानं चीनसोबत असलेल्या मतभेदांवर उपाय सुचवला पाहिजे. तसेच चीनसोबत या मतभेदांच्या निराकरणासाठी भारतानं प्रयत्न केले पाहिजेत, असंही लेखात मांडण्यात आलं आहे. तसेच दोन देश सर्वच मुद्द्यावर सहमत होती असेही नाही, चीन आणि अमेरिकेमध्येही अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र चीन आणि अमेरिकेनं अजूनही द्विपक्षीय संबंध अबाधित ठेवले आहे. भारतानं यातून काही तरी शिकलं पाहिजे, असंही लेखात म्हटलं आहे. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियासह अनेक मोठ्या देशांनी OBOR या प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला आहे. दोन्ही देशांनी विध्वंसक ताकद ठेवणा-या इतर देशांपासूनही सावध राहिलं पाहिजे.      

 

Web Title: Opposition to India's One Belt One Road Project for Political Scene- China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.