ट्रम्प यांना विरोध वाढत चालला
By Admin | Published: March 21, 2016 02:44 AM2016-03-21T02:44:41+5:302016-03-21T02:44:41+5:30
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे जगभरात चर्चित झालेले अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांना येथे विरोध वाढत चालला आहे.
वॉशिंग्टन : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे जगभरात चर्चित झालेले अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांना येथे विरोध वाढत चालला आहे.
शनिवारी त्यांच्या विरोधकांनी अॅरिसोना येथे मोटारी आडव्या घालून त्यांचा रस्ता कित्येक तास रोखला. याशिवाय अनेकांनी मॅनटहटनस्थित ट्रम्प टॉवरच्या बाहेर रॅलीही काढली आणि रिपब्लिकन उमेदवाराविरुद्ध विरोध नोंदविला.
फिनिक्सच्या बाहेर विरोध प्रदर्शनाच्या फुटेजमध्ये लोक घोषणा देताना दिसून आले. त्यांच्या हातात ‘डम्प ट्रम्प’ आणि ‘शटडाऊन ट्रम्प’ यासारख्या घोषणा लिहिलेले फलक होते.
या निदर्शनानंतर अॅरिझोणा येथे झालेल्या रॅलीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ही निदर्शने अपमानकारक असल्याचे सांगून संघर्ष टाळल्याबद्दल पोलिसांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, पोलिसांनी तिघांना पकडले असून बाकीचे लोक पळून गेले. पोलिसांवर आमचे प्रेम असून आम्हाला बरेच काही करावे लागेल.
अमेरिकेत ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून उमेदवार निवडीची प्रक्रिया चालू आहे. त्यात सध्या तरी रिपब्लिकन पक्षातर्फे ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.