नागालॅंडमध्ये महिला आरक्षणाचा विरोध, सरकारी इमारतींची जाळपोळ
By admin | Published: February 2, 2017 10:09 PM2017-02-02T22:09:39+5:302017-02-02T22:09:39+5:30
सरकारी इमारतींची जाळपोळ,इंटरनेट सर्विस बंद, 1 फेब्रुवारीला होणा-या नगर परिषद निवडणुकाही रद्द
Next
>ऑनलाइन लोकमत
कोहिमा, दि. 2 - नागालॅंडची राजधानी कोहिमा येथे नगर परिषद निवडणुकांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकर्त्यांनी अनेक सरकारी इमारतींची जाळपोळ केली आहे.
आज या आंदोलनाने आणखी उग्र रूप धारण केलं असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलं आहे. तसंच राज्य सरकारने इंटरनेट सर्विस बंद केली असून 1 फेब्रुवारीला होणा-या नगर परिषद निवडणुका रद्द केल्या आहेत. हजारो लोकांच्या जमावाने सचिवालय, कोहिमा पालिका मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ही कार्यालये पेटवून दिली आहेत.
येथील जनजातीय संस्थेचा महिलांना आरक्षण देण्याचा विरोध आहे. मंगळवारी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत दोन तरूणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. जोपर्यंत मुख्यमंत्री टी.आर. झेलिआंग आणि त्यांचे मंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत मृत तरूणांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.