फेसबूक पोस्ट 'डिसलाईक' करण्याचाही ऑप्शन

By Admin | Published: September 16, 2015 01:46 PM2015-09-16T13:46:39+5:302015-09-16T15:31:17+5:30

फेसबूकवरील एखादी पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओसाठी लाईकप्रमाणेच 'डिसलाईक'चा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

The option to 'highlight' the Facebook post | फेसबूक पोस्ट 'डिसलाईक' करण्याचाही ऑप्शन

फेसबूक पोस्ट 'डिसलाईक' करण्याचाही ऑप्शन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १६ - फेसबूकवर एखादा फोटो, पोस्ट किंवा व्हिडीओ पडण्याचा अवकाश त्याच्यावर क्षणात 'लाईक्स'ची बरसात होते. मात्र टाकण्यात आलेली पोस्ट गंभीर किंवा दु:खद घटनेबद्दल असेल तर त्यावर आपली सहमती दर्शवण्यासाठी 'लाईक'चा पर्याय कितपत संयुक्तिक ठरतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे लक्षात घेऊनच आता फेसबूक पोस्टसाठी लाईकप्रमाणेच 'डिसलाईक'चा पर्यायही उपलब्ध होणार आहे. फेसबूकचे सीईओ ( मुख्य कार्यकारी अधिकारी) मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी ही महत्वपूर्ण घोषणा केली.
फेसबूकवर डिसलाईकचा पर्याय देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून युझर्सकडून होत असून अखेर त्यांची दखल घेत हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय फेसबूकने घेतला आहे. ' एखाद्या दुःखद घटनेच्या पोस्टसाठी युजर्सकडे फक्त लाईकचाच पर्याय आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी युझर्सकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसतो आणि अशा दु:खद पोस्ट लाईक करणं युझर्सना योग्य वाटत नाही. हे लक्षात घेऊनच कंपनीने डिसलाईकचा पर्याय आणण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याची चाचणी करण्यात येणार असून त्यानंतर युजर्सच्या पोस्टवर हा पर्याय उपलब्ध होईल, असे झुकेरबर्ग यांनी सांगितले. 

Web Title: The option to 'highlight' the Facebook post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.