..अन्यथा भारताविरोधात आम्ही सैन्याचा वापर करू- चीन

By admin | Published: July 4, 2017 05:39 PM2017-07-04T17:39:54+5:302017-07-04T17:39:54+5:30

सिक्कीममधल्या डोंगलांग भागातील सीमावादावरचं भारत आणि चीनमधलं वाकयुद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही

Or else, we should use the army against India - China | ..अन्यथा भारताविरोधात आम्ही सैन्याचा वापर करू- चीन

..अन्यथा भारताविरोधात आम्ही सैन्याचा वापर करू- चीन

Next

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 4 - सिक्कीममधल्या डोंगलांग भागातील सीमावादावरचं भारत आणि चीनमधलं वाकयुद्ध थांबण्याचं काही नाव घेत नाही. भारतानं जर चीनचं ऐकलं नाही, तर चीन स्वतःच्या सैन्याच्या ताकदीचा वापर करेल, असं एका चिनी तज्ज्ञानं सांगितलं आहे. डोंगलांगमध्ये दोन्ही देशांमधील वादाचा हा तिसरा आठवडा आहे. दोन्ही देशांमधील हा वाद योग्यरीत्या हाताळला न गेल्यास युद्धाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते, अशा इशारा चीनच्या थिंक टँकनं आधीच दिला आहे.

भारताला समजावण्याचा चीन कसोशीनं प्रयत्न करत असून, सीमेवर शांती नांदावी यासाठी चीन कटिबद्ध आहे, असंही शांघाई अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेजचे रिसर्चर फेलो हू झियोंग म्हणाले होते. मात्र तरीही भारतानं चीनचं न ऐकल्यास चीनकडे सैन्य शक्तीचा वापर करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीमुळेच भारत चीनला युद्धासाठी भडकावतो आहे. ट्रम्प यांच्या नजरेत भारत चीनशी मुकाबला करण्यासाठी कमकुवत आहे, असंही हू म्हणाले आहेत.
(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)
(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)

सिक्कीम सीमेवर सध्या उद्भवलेला तणाव हा 1962च्या युद्धानंतर भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये सर्वात दीर्घकाळ सुरू राहिलेला तिढा आहे. विशेष म्हणजे भारत आणि शेजारी भूतानने निषेध नोंदविल्यानंतर माघारी हटण्याऐवजी सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला आक्रमक पवित्रा, भारताचे सीमेवरील दोन बंकर नष्ट केले जाणे आणि चीनच्या राजनैतिक प्रतिक्रियेला चढलेली अधिक तिखट धार पाहता भारताने सावधानता म्हणून ही तयारी केली आहे. खुद्द लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, चीन आणि देशांतर्गत अशांतता अशा अडीच आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल रावत यांनी दिली होती.डोका ला भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक रेटारेटी होऊन परिस्थिती गंभीर झाल्यानंतर भारतीय लष्कराने मेजर जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला तातडीने तेथे पाठवून चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी ध्वजबैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. दोनदा नकार दिल्यानंतर तिसऱ्या वेळी चीन ध्वजबैठकीला आला पण डोका लाच्या लालटेन भागातून भारतानेच आपले सैन्य काढून घ्यावे, असा उरफाटा प्रस्ताव त्याने दिला. चीनने सिक्किम सीमेवरील या घटनाक्रमाचे निमित्त पुढे करून नथु ला खिंडीतून जाणारी कैलास-मानसरोवर यात्राही अडवून ठेवली.

Web Title: Or else, we should use the army against India - China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.