गणेश सजावट स्पर्धेचं आखाती देशांत आयोजन
By admin | Published: September 17, 2015 03:46 AM2015-09-17T03:46:58+5:302015-09-17T03:46:58+5:30
आखातामध्ये भारतीय व विशेषत: मराठी नागरिक मोठ्या संख्येने असून तिथेही घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातो. या आखाती देशातील गणेशभक्तांसाठी आखातीमराठीडॉटकॉम
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. १७ - आखातामध्ये भारतीय व विशेषत: मराठी नागरिक मोठ्या संख्येने असून तिथेही घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातो. या आखाती देशातील गणेशभक्तांसाठी आखातीमराठीडॉटकॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार म्हणजे १७ सप्टेंबरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत कुवेत, ओमान, कतार, बहारीन, सौदी अरेबिया या देशांसह संयुक्त अरब अमिरातीतील सर्व आखातीकरांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे स्पर्धा संयोजक समितीच्या अबोली कर्णिक व हर्षा चांदे यांनी सांगितले.
गेली काही वर्षे आखाती देशांमध्ये त्यातही प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती व ओमान या ह्या देशांमध्ये घरी गणपती आणण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीचे मखर किंवा सजावट करण्याकडे देखील लोकांचा कल वाढू लागला आहे. २०१३ साली आखाती मराठी तर्फे अशा प्रकरच्या सजावट स्पर्धेचे प्रथम आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मिळालेला उत्कृष्ट असा प्रतिसाद पाहून यंदा स्पर्धेचे स्वरूप थोडे व्यापक आणि भव्य असे करण्यात आले आहे.
www.ganeshsajavat.aakhatimarathi.com या वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करून आखातीकर या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना घरातील गणपती सजावटीचे फोटो ह्या साईटवर अपलोड करायचे आहेत. या फोटोंना फेसबुकवर किती लाईक्स मिळतात. त्याचबरोबर किती शेअर केले जातात यासोबतच परीक्षकांच्या मतानुसार स्पर्धेतील विजेते निवडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत असताना उत्सव यतासांग व विधीवत पार पडावा यासाठी आखातीमराठी पूजा कशी करावी, साहित्य काय लागतं याचं मार्गदर्शन ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर पारंपारिक आरती संग्रह देखील उपलब्ध करण्यात आला आहे.