मंगळावर ओरियन यान अंतराळवीरांना घेऊन जाईल

By admin | Published: February 27, 2017 04:50 AM2017-02-27T04:50:20+5:302017-02-27T04:50:20+5:30

ओरियन या अवकाशयानात अंतराळवीर ठेवायचा विचार अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (नासा) करीत आहे

Orion Yan will take the astronauts to Mars | मंगळावर ओरियन यान अंतराळवीरांना घेऊन जाईल

मंगळावर ओरियन यान अंतराळवीरांना घेऊन जाईल

Next


फ्लोरिडा : चंद्राभोवती चाचणीचा भाग म्हणून फिरवण्यात येणाऱ्या ओरियन या अवकाशयानात अंतराळवीर ठेवायचा विचार अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (नासा) करीत आहे. नासाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार ओरियनची बांधणी एक दिवस मंगळावर अंतराळवीरांना घेऊन जाईल (कदाचित २०३० मध्ये) या दृष्टीने केली जात आहे. आताच्या नियोजनानुसार ओरियनचे चाचणी उड्डाण हे ईएम-१ (एक्स्प्लोरेशन मिशन-१) २०१८ मध्ये होईल व त्यात अंतराळवीर नसेल. नासाचे कार्यकारी प्रशासक रोबर्ट लाईटफूट यांनी १५ फेब्रुवारी रोजी नासाला त्या यानात अंतराळवीर ठेवणे व्यावहारिकदृष्ट्या कसे राहील याचा अभ्यास करण्यास सांगितले. या अभ्यासाचे निष्कर्ष येत्या काही महिन्यांत येण्याची अपेक्षा आहेत.
ओरियन अंतराळयान आणि स्पेश लाँच सिस्टीम अग्निबाणाच्या आमच्या नियोजित मोहिमांची अमलबजावणी सुरक्षितपणे व परिणामकारकतेने व्हावी याला आमचे प्राधान्य आहे, असे नासाच्या मानवी मोहिमांचे सहयोगी प्रशासक व मोहिमांचे संचालक बिल गर्स्टेनमायर यांनी म्हटले. ओरियन हे यान (कॅप्सूल) स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) या नावाच्या अग्निबाणावर ठेवून अंतराळात सोडले जाईल. हा अग्निबाण नासा विकसित करत असून जगातील हा सगळ््यात शक्तिशाली अग्निबाण असल्याचे वर्णन नासाने केले. आतापर्यंतच्या कोणत्याही अंतराळयानापेक्षा ओरियन खूप पुढे जाईल, असे नासाने म्हटले.

Web Title: Orion Yan will take the astronauts to Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.