ओरलँडो हल्ला - डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली मुस्लिमांच्या प्रवेशबंदीची मागणी

By Admin | Published: June 14, 2016 08:37 AM2016-06-14T08:37:53+5:302016-06-14T08:41:06+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी आणण्याची मागणी केली आहे

Orlando attack - Donald Trump again calls for the entry of Muslims | ओरलँडो हल्ला - डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली मुस्लिमांच्या प्रवेशबंदीची मागणी

ओरलँडो हल्ला - डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली मुस्लिमांच्या प्रवेशबंदीची मागणी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत - 
वॉशिंग्टन, दि. 14 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ओरलँडो येथील गे नाइट क्लबवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर सलग ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं मत मांडलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावरदेखील निशाना साधला.
 
मूळचा अफगाणिस्तानचा आणि अमेरिकेचा नागरिक असलेल्या ओमर मीर सिद्दिकी मतीन याने ओरलँडो येथील समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला केला. या हल्ल्यात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला.  9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रचारासाठी फायदा करुन घेत असल्याचा आरोप केला जात आहे. 
 
'ओरलँडोमध्ये जे झालं ही सुरुवात आहे. आपलं नेतृत्व कमकुवत आणि कुचकामी आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी कट्टर इस्लामी देशांमधील नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी आणणं गरजेच असल्याचं मी माझ्या अगोदरच्या भाषणात म्हटलं आहे', असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. 
 
'जोपर्यंत आपलं समाधान होत नाही तोपर्यंत परदेशी मुस्लिमांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी आणली पाहिजे. आपल्या चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकेत अशा हल्लेखोरांना प्रवेश मिळत असल्याचंही', ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 
 
 
'आपण हजारो लोकांना अमेरिकेत येण्याची परवानगी देऊ शकत नाही. कारण यापैकी अनेकजण ओरलँडोमधील हल्लेखोराप्रमाणे विचार करतात. जर बराक ओबामा अजूनही ‘कट्टर इस्लामी दहशतवाद’ ही संज्ञा वापरणार नसतील तर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा', अशी मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 'जर हिलरी क्लिंटनदेखील अशाच प्रकारे विचार करत असतील तर मग त्यांनीदेखील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होऊ नये', असंही ट्रम्प बोलले आहेत. 
 
हिलरी क्लिंटन यांनीदेखील ओरलँडो हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्विटरद्वारे त्यांनी निषेध व्यक्त करत युद्धात वापरल्या जाणा-या शस्त्रांना रस्त्यावर काही स्थान नसल्याचं म्हटलं आहे. 
 
 

Web Title: Orlando attack - Donald Trump again calls for the entry of Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.