ओरलँडोचा हल्लेखोर ओमर मतीन होता समलैंगिक ?
By admin | Published: June 15, 2016 09:15 AM2016-06-15T09:15:23+5:302016-06-15T09:49:39+5:30
ओरलँडो शहरात समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून 50 जणांना ठार करणार हल्लेखोर ओमर मतीन स्वत: समलैंगिक होता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 15 - फ्लोरिडा येथील ओरलँडो शहरात समलैंगिकांच्या नाइट क्लबवर हल्ला करून 50 जणांना ठार करणार हल्लेखोर ओमर मतीन स्वत: समलैंगिक होता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र राग आणि लाजेखातर त्याने आपली ओळख लपवून ठेवली होती अशी शंका ओमरचे मित्र आणि पत्नीने व्यक्त केली आहे.
ओमर मतीनचा त्याची पत्नी सितोरा युसुफीसोबत घटस्फोट झाला होता. ओमर समलैंगिक असल्याची शक्यता नाकारता येणार नाही असा दावा सितोरा युसुफीने केला आहे. विशेष म्हणजे ओमर नेहमी या समलैंगिकांच्या नाइट क्लबमध्ये अशी माहिती क्लबमधील काही लोकांनी दिली आहे.
ओमरचे वडील त्याला समलैंगिकच म्हणत असत अशी माहिती सितोरा युसुफीने दिली आहे. ओमर गे-डेटिंग अॅपचादेखील वापर करत होता अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा सध्या तपास करत असून तो किती वेळा नाइट क्लबला गेला होता ? तसंच अॅपचा वापर करत होता की नव्हता ? याचा तपास करत आहे. ओमर आणि माझी ओळख 2008 मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर 2009 मध्ये आम्ही लग्न केलं अशी माहिती सितोरा युसुफीने दिली आहे.
ओमर मतीनच्या गे-डेटिंग अॅप वापरासंबंधी एफबीआय तपास करत आहे. ज्या नाईट क्लबमध्ये ओमरने हल्ला करुन 50 जणांना ठार केलं त्या नाईट क्लबमध्ये तो नेहमी येत असे अशी माहिती क्लबच्या मालकाने दिली आहे. ओमर नेहमी त्या क्लबमध्ये जायचा मात्र तो समलैंगिक नाईट क्लब असं त्याने मला कधीच सांगितल नव्हतं असंही सितोरा युसुफीने सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वी दोन पुरुषांना एकमेकांचं चुंबन घेताना पाहून ओमरला प्रचंड राग आला होता अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे.
केविन वेस्ट नावाच्या व्यक्तीने आपण गे-डेटिंग अॅपवरुन त्याच्याशी चॅट केलं होतं, पण आमची कधी भेट झाली नव्हती अशी माहिती दिली आहे. रविवारी रात्री क्लबमध्ये तो कोणाला तरी सोडण्यासाठी आला होता त्यावेळी त्याला आपण ओळखलं होतं. आमच्यात औपचारिक संभाषण झालं होतं असं केविन वेस्टने सांगितलं आहे.
ओमरने आपल्याला एक मुलगा असल्याचं क्लबमधील काहीजणांना सांगितलं होतं. तो आपल्या वडिलांबद्दल नेहमी सांगत असे. अनेकदा तो एकटाच बसून दारु पीत असे. जास्त दारु प्यायल्यानंतर त्याची भांडणंही होत असत. तो नेहमी येथे येत असे आणि जाताना आपल्यासोबत एखाद्या मुलाला नेण्याचा प्रयत्न करत असते असं क्लबमधील एका व्यक्तीने सांगितलं आहे.
ओमरने एकदा मला त्याच्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याला तू समलैंगिक आहेस का ? असं विचारलं होतं. मात्र त्याने त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता अशी माहिती ओमरच्या मित्राने दिली आहे. ओमर समलैंगिक होता पण तो लोकांना याबद्दल सांगत नसे असा अंदाजही त्याने व्यक्त केला आहे.
ओमर मतीन याने अमेरिकेत आणीबाणीच्या प्रसंगात वापरल्या जाणाऱ्या ९११ या क्रमांकाद्वारे इसिसशी निष्ठा व्यक्त केली होती. या नाईट क्लबवर सुरुवातीला हल्ला केल्यानंतर त्याने ९११ या क्रमांकावर इस्लामिक स्टेटचा नेता अबू बकर अल बगदादी याच्याशी निष्ठा व्यक्त केली होती, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली. या फोन संभाषणात मतीन याने बोस्टन बाँबर्स त्सार्नाएव्ह बंधुंबद्दल निष्ठा व्यक्त केली होती. २०१३ मध्ये या बंधुंनी बोस्टन मॅरेथॉनमध्ये बाँबस्फोट घडविले होते. मतीनने गे क्लबच्या बाथरूममधून ९११ क्रमांकावर फोन करून स्वत:चे पूर्ण नाव त्याला सांगितले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.