ओसामाला बदलायचे होते ‘काईदा’चे रुपडे!
By admin | Published: February 20, 2015 02:03 AM2015-02-20T02:03:57+5:302015-02-20T02:03:57+5:30
खात्मा होण्याच्या काही महिन्यांपूर्वी अल काईदा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा एक जागतिक दहशतवादी संघटना म्हणून आपली संघटन पुढे आणण्याचा विचार होता.
वॉशिंग्टन : पाकिस्तानात एका मोहिमेत अमेरिकी विशेष बलाद्वारे खात्मा होण्याच्या काही महिन्यांपूर्वी अल काईदा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा एक जागतिक दहशतवादी संघटना म्हणून आपली संघटन पुढे आणण्याचा विचार होता. मात्र, त्याचा हा मानस उघड झाल्याने तो निराश होता व इस्लामशी संबंधित संघटना म्हणून याची ओळख व्हावी म्हणून या समूहाचे नाव बदलण्याची त्याची इच्छा होती, असा दावा अमेरिकेने केला आहे. व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी ही माहिती दिली. काईदाप्रमुख ओसामा याचा पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे गोपनीय माहितीच्या आधारे खात्मा करण्यात आला होता. अबोटाबाद येथून मिळालेल्या गुप्त माहितीचा हवाला देत, अल काईदाच्या नावात बदल करण्याची त्याची इच्छा होती. इस्लामच्या अधिक नजीकची संघटना म्हणून त्याला ओळख निर्माण करायची होती, असे अर्नेस्ट म्हणाल्या.
लादेनला पकडून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याच्या प्रक्रियेत अमेरिकी कमांडोला महत्त्वाची माहिती मिळाली असून या आधारे काईदाच्या विचारपद्धतीची ओळख लावण्यास मदत होत आहे. (वृत्तसंस्था)