Oscar 2017 - हे आहेत विजेते...!
By admin | Published: February 27, 2017 04:42 PM2017-02-27T16:42:50+5:302017-02-27T16:42:50+5:30
ला ला लॅण्डने 6 पुरस्कार पटकावले. या चित्रपटातील भूमिकेसाठी एमा स्टोनला प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा' पुरस्कार मिळाला आहे. वाचा संपूर्ण ऑस्कर विजेत्यांची यादी..
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. 27 - ऑस्कर पुरस्कार मिळणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. हृदयाचा ठोका चुकायला लावणा-या, हॉलिवूडमधील मानाच्या समजल्या जाणारा पुरस्कार कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचे हे पुरस्कार सोहळ्याचे ८९ वे वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्याला हॉलिवूडसह बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी ऑस्कर पुरस्कर सोहळ्यात मूनलाईट आणि ला ला लॅण्ड यांनी बाजी मारली आहे. मूनलाईट' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासह ' ला ला लॅण्ड'ने 6 पुरस्कार पटकावले. या चित्रपटातील भूमिकेसाठी एमा स्टोनला प्रथमच ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा' पुरस्कार मिळाला आहे. वाचा संपूर्ण ऑस्कर विजेत्यांची यादी..
सर्वोत्कृष्ट चित्रपट - मूनलाईट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी अॅफ्लेक (मँचेस्टर बाय द सी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डेमियन चॅझेल (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट सह अभिनेता - महेरशाला अली (मूनलाईन)
सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री - व्हायोला डेव्हिस (फेन्सेस)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ला ला लँडसर्वोत्कृष्ट अनिमेशनपट - झूटोपिया
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर - ओ. जे. : मेड इन अमेरिका
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फार्इंड देम
सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - सुसाईड स्क्वाड
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - हॅकसॉ रिज (केविन ओनेल)
सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) - मँचेस्टर बाय द सी (केनेथ लोनरगन)
सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) - मूनलाईट (बॅरी जेंकिन्स आणि टॅरेल अॅल्विन मॅकक्रेने)
सर्वोत्कृष्ट गीत - सिटी आॅफ स्टार्स (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - लाईनस सॅडग्रेन (ला ला लँड )
सर्वोत्कृष्ट संकलन (एडिटिंग) - हॅकसॉ रिज
सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट - द सेल्समन
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - ला ला लँड
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉट - पाईपर
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - अराईव्हल
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - द जंगल बुक
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट - सिंग