Oscar 2018: ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्रीच्या हस्ते पुरस्कार वितरीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 09:05 AM2018-03-05T09:05:01+5:302018-03-05T09:11:01+5:30

90 व्या ऑस्कर पुरस्कार 2018 सोहळ्याची कॅलिफोर्नियातील डोल्बी थिएटरमध्ये शानदार सुरुवात झाली आहे.

Oscar 2018: Daniela Vega becomes first openly transgender Oscars presenter | Oscar 2018: ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्रीच्या हस्ते पुरस्कार वितरीत 

Oscar 2018: ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्रीच्या हस्ते पुरस्कार वितरीत 

Next

कॅलिफोर्निया - 90 व्या ऑस्कर पुरस्कार 2018 सोहळ्याची कॅलिफोर्नियातील डोल्बी थिएटरमध्ये शानदार सुरुवात झाली आहे.  प्रत्येक कलाकारासाठी अतिशय  महत्त्वपूर्ण असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थित दर्शवली आहे. पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणा-या या पुरस्कार सोहळ्याची परंपरा सुरू आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 90 वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जिम्मी किमेल करत आहेत. दरम्यान यंदा ऑस्कर सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्री डेनियला वेगा हिच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. अभिनेत्री मेरिल स्ट्रीपला यंदाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात नामांकन मिळाले आहे.  21 नामांकने मिळवत या अभिनेत्री यंदा वेगळाच रेकॉर्ड रचला आहे. शिवाय,यापूर्वी तीन वेळा तिनं ऑस्कर पुरस्कार मिळवलादेखील आहे. 

गेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विजेता यंदाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा करतो, ही ऑस्कर सोहळ्याची परंपरा आहे. मात्र, जेनिफर लॉरेन्स आणि जे. फोस्टर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराची घोषणा करणार आहेत व जेन फोंडा आणि हेलेन मिरेन विजेत्याला पुरस्कार प्रदान करणार आहेत.   
 

Web Title: Oscar 2018: Daniela Vega becomes first openly transgender Oscars presenter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.