Oscar 2018 : 'द शेप ऑफ वॉटर' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:09 AM2018-03-05T07:09:42+5:302018-03-05T13:50:13+5:30

आंतरराष्ट्रीय सिनेजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. 

Oscar 2018 Live Updates: Cast of the 90th Oscar Awards, Artists on Red Carpet | Oscar 2018 : 'द शेप ऑफ वॉटर' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

Oscar 2018 : 'द शेप ऑफ वॉटर' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

Next

जगभरातील सिनेप्रेमींना उत्सुकता लागून असलेला 90 वा ऑस्कर 2018 पुरस्कार सोहळा कॅलिफॉर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. 'शेप ऑफ वॉटर' सिनेमाने ऑस्कर 2018 सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर आणि प्रॉडक्शन डिझाईन या विभागांमध्येही 'शेप वॉटरला ऑस्कर'ने गौरवण्यात आले.'शेप ऑफ वॉटर'ला एकूण 13 विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती.  तर क्रिस्टोफर नोलान यांच्या 'डंकर्क' सिनेमाला तीन आणि डेनिस विलेन्यू यांच्या 'ब्लेड रनर 2049' सिनेमाला 2 पुरस्कार मिळाले आहेत.

हॉलिवूडमधील प्रतिष्ठित 90वा अकादमी अवार्ड (ऑस्कर अवार्ड 2018) कार्यक्रम सोहळ्याला  भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास शानदार सुरुवात झाली. अभिनेता जिमी किमेल आणि ट्रान्सजेंडर अभिनेत्री डेनियल वेगा यांनी कार्यक्रमात पुरस्कार वितरीत केले. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ट्रान्सजेंडरनं पुरस्काराचे वितरण केले आहे.  तर यंदा अभिनेत्री मेरिल स्ट्रीपनं 21वेळा नामांकने मिळवण्याचा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वीही तीन वेळा मेरिल स्ट्रीपला पुरस्कारनं गौरवण्यात आले आहे. 
दरम्यान, सोहळ्यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 ला तर शशी कपूर यांचे 4 डिसेंबर 2017ला निधन झाले होते. 

'ऑस्कर'चे मानकरी

 वर्ग

विजेता
लाइव अॅक्शन शॉर्टद सायलंट चाइल्ड (क्रिस ओवर्टन आणि रॅचेल शेंटन)
बेस्ट एडिटिंग डंकर्क (ली स्मिथ)
बेस्ट व्हिज्युअल इफेक्टब्लेड रनर 2049 
बेस्ट अॅनिमेटेड फिल्मकोको
बेस्ट शॉर्ट फिल्म-अॅनिमेटेडडिअर बास्केटबॉल'
बेस्ट फॉरेन लॅग्वेज फिल्मअ फॅन्टॅस्टिक वुमन
बेस्ट प्रॉडक्शन डिझाईनशेप ऑफ वॉटर
बेस्ट साउंड मिक्सिंगडंकर्क (रिचर्ड किंगस अॅलेक्स गिबसन)
बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर

इकारस

बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन   
 
 फँटम थ्रेड
बेस्ट मेकअप अँड हेअर स्टाइल    डार्केस्ट आवर
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरसॅम रॉकवेल  
बेस्ट पिक्चरद शेप ऑफ वॉटर  
बेस्ट डायरेक्टरद शेप ऑफ वॉटर(गिलर्मो डेल टोरो)
बेस्ट अॅक्टरगॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट आवर)
बेस्ट अॅक्ट्रेसफ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
 
बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसएलिसन जेनी
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्लेगेट आउट (जॉर्डन पीले)
  

 



 


अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सनं कार्यक्रमादरम्यान आपले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.  



2012 साली प्रदर्शित झआलेल्या "सिल्व्हर लाइनिंग प्लेबुक" या सिनेमासाठी जेनिफर लॉरेन्सला बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेससाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.  जेनिफर लॉरेन्स 2015-16 मध्ये हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती.  



 



 



 



 



 



 



 

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकने

सर्वोत्कृष्ट चित्रपट
कॉल मी बाय युअर नेम
डार्केस्ट आवर
डंकर्क
गेट आऊट
लेडी बर्ड
फँटम थ्रेड
द पोस्ट
द शेप ऑफ वॉटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
ख्रिस्तोफर नोलान (डंक्रिक)
जॉर्डन पीले (गेट आऊट)
ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)
गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
मार्गो रॉबी (आय टोन्या)
साईरसे रोणान (लेडी बर्ड)
मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता
टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)
डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)
गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट आवर)
डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
मेरी जे. ब्लिज (मडबाऊंड)
अॅलिसन जेनी (आय टोन्या)
सेस्ली मॅनविले (फँटम थ्रेड)
लॉरी मेटकाल्फ (लेडी बर्ड)
ओक्टाविया स्पेन्सर (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
विलिएम डफो (द फ्लोरिडा प्रोजेक्ट)
वूडी हारेलसन (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिझूरी)
रिचर्ड जेनकिन्स (ऑल द मनी इन द वर्ल्ड)
सैम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मझूरी)

Web Title: Oscar 2018 Live Updates: Cast of the 90th Oscar Awards, Artists on Red Carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.