‘मूनलाइट’ला आॅस्कर

By admin | Published: February 28, 2017 04:27 AM2017-02-28T04:27:53+5:302017-02-28T04:27:53+5:30

अँड आॅस्कर गोज टू ‘ला ला लँड’ असे जाहीर होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला

Oscar to 'Moonlight' | ‘मूनलाइट’ला आॅस्कर

‘मूनलाइट’ला आॅस्कर

Next


लॉस एंजिलिस : अँड आॅस्कर गोज टू ‘ला ला लँड’ असे जाहीर होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला खरा, पण या चित्रपटाच्या कलाकारांसाठी तो औटघटकेचा आनंद ठरला. कारण आॅस्करचे विजेते जाहीर करताना चुकून हे नाव जाहीर झाले होते. यात दुरुस्ती करत नंतर बॅरी जेन्किंस यांच्या ‘मूनलाइट’या चित्रपटाला आॅस्कर जाहीर झाले, तर ‘ला ला लँड’ या चित्रपटाला उत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसह सहा पुरस्कार मिळाले.
आॅस्करच्या दिमाखदार सोहळ्यात हा गोंधळात गोंधळ दिसून आला. या कार्यक्रमाचे निवेदन करणारे वॉरेन बीटी आणि फे डनअवे यांनी चुकून ‘ला ला लँड’ला उत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित केले. चुकीच्या लिफाफ्यामधून हे नाव जाहीर झाल्याचे लक्षात येताच, येथे उपस्थित ‘ला ला लँड’चे निर्माते जॉर्डन होरोवित्ज यांनी घोषणा केली की, हा पुरस्कार ‘मूनलाइट’ला मिळत आहे. अर्थात, यामुळे गोंधळ वाढतच गेला. विजेता नेमका कोण? असा प्रश्न पडला. तेव्हा जॉर्डन यांना खुलासा करावा लागला की, ‘आम्ही थट्टा मस्करी करत नाहीत.’ त्यांनी दर्शकांना ते कार्डही उंचावून दाखविले, ज्यावर ‘मूनलाइट’ लिहिले होते.
झालेल्या प्रकारामुळे गोंधळून गेलेल्या वॉरेन बीटी या निवेदकाने स्पष्ट केले की, मी थट्टा करण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही. हे सर्व चुकून झाले आहे. मी जो लिफाफा उघडला, त्यात मला ‘ला ला लँड’चे नाव दिसले. त्यामुळे मी हे नाव जाहीर केले. निवेदक जिमी किमेलने हसत हसतच सांगितले की, ‘नेमके काय झाले ते ठाऊक नाही, पण त्याची जबाबदारी मात्र आम्ही घेतो.’
‘मूनलाइट’ हा चित्रपट तारेल अल्विन मेकक्रेनी यांच्या आत्मकथात्मक नाटकावर ‘इन मूनलाइट ब्लॅक बॉयज लुक ब्लू’वर आधारित आहे. हा एक छोट्या बजेटचा चित्रपट आहे. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक, पटकथा, चित्रपट या श्रेणीसाठी एकाच वेळी नामनिर्देशन मिळविले.
>सनी पवार चमकला
भारतीय वंशाचे अभिनेते देव पटेल यांना सह अभिनेत्याच्या पुरस्काराने भलेही हुलकावणी दिली असेल, पण त्यांच्या
आठ वर्षीय सहकलाकाराने सनी पवारने मात्र, येथे उपस्थितांची मने जिंकली.
तो मी नव्हेच
‘ला ला लँड’ची आॅस्करसाठी निवड झाल्याचे कळताच, या चित्रपटाचे निर्माते जॉर्डन होरोवित्ज यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही, पण ‘तो मी नव्हेच’ हे कळताच त्यांनी अतिशय नम्रपणे ‘मूनलाइट’च्या टीमला आॅस्कर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी बोलाविले. एकीकडे ‘ला ला लँड’च्या टीममध्ये शांतता पसरली असतानाच, दुसरीकडे ‘मूनलाइट’टीमच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नाही. या घटनाक्रमामुळे आश्चर्यचकीत झालेले ‘मूनलाइट’चे दिग्दर्शक बारी जेन्किंस म्हणाले की, ‘माझ्या स्वप्नातही हे खरे होऊ शकत नाही. जे झाले ते दुर्भाग्यपूर्ण होते, पण चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याने मी आनंदी आहे.’ ‘मूनलाइट’ने एकूण तीन पुरस्कार जिंकले आहेत.
>कंपनीने
मागितली माफी
कार्यक्रमातील नामांकनाची जबाबदारी स्वीकारलेल्या अकांउंटिंग कंपनीने ‘प्राइस वॉटर हाउस कूपर्स’ने पुरस्काराच्या गोंधळाबाबत माफी मागितली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, या घटनाक्रमात निवेदन करणाऱ्यांची चूक नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
>प्रियांका चोप्राही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित
होती.
>सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक :
३२ वर्षांचे दिग्दर्शक डेमियन शैजेल (‘ला ला लँड’)
सर्वश्रेष्ठ अभिनेते : कॅसी एफ्लेक (‘मॅनचेस्टर
बाय दी सी’)
सर्वश्रेष्ठ
अभिनेत्री : एमा स्टोन (‘ला ला लँड’)
सर्वश्रेष्ठ सह अभिनेते : महेरशला अली
सर्वश्रेष्ठ सह अभिनेत्री : वॉयला डेविस (‘फेंसिस’)
सर्वश्रेष्ठ मूळ पटकथा : कॅनेथ लोनरगन (‘मेनचेस्टर
बाय सी’)
सर्वश्रेष्ठ पटकथा : जेन्किंस
आणि
मॅकके्रने (‘मूनलाइट’)
सर्वश्रेष्ठ छायांकन :
‘ला ला लँड’
सर्वश्रेष्ठ
विदेशी चित्रपट : असगर फरहदी
(‘द सेल्समॅन’)
सर्वश्रेष्ठ मेकअप : एलेजांड्रो बर्तोलाजी (‘सुसाइड स्क्वॉड’)
‘जुटोपिया’ला सर्वश्रेष्ठ एनिमेटेड फिचरचा पुरस्कार
एडिटिंग
अँड साउंड मिक्सिंग : ‘वर्ल्ड वॉर टू’
व्हिज्युअल
इफेक्ट :
भारतीय
वंशाचा नील सेठी
कॉस्ट्यूम डिझाइन : कोलिन एटवुड
डॉक्युमेंट्री शॉर्ट :
द व्हाइट हेल्मेटस्
संपादन : हॅकशा रिज, जॉन गिल्बर्ट
बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर :
ओ जे : ‘मेड इन अमेरिका’

Web Title: Oscar to 'Moonlight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.