पाकिस्‍तानात जूनपर्यंत 2 कोटींवर पोहोचू शकतो कोरोनाग्रस्तांचा आकडा, अशी असूशकते जगाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 05:35 PM2020-03-24T17:35:28+5:302020-03-24T17:50:31+5:30

येथे सिंधमध्ये 394, पंजाबमध्ये 249, बलूचिस्‍तानात 110, पाकव्याप्त कश्‍मिरात 72, खैबर पख्‍तूंख्‍वांमध्ये 38 आणि इस्‍लामाबादमध्ये 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जगाचा विचार करता आणि जागतीक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे तब्बल 190 देशांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. यामुळे 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Over 2 crore pakistanis could be impacted by corona till june sna | पाकिस्‍तानात जूनपर्यंत 2 कोटींवर पोहोचू शकतो कोरोनाग्रस्तांचा आकडा, अशी असूशकते जगाची स्थिती

पाकिस्‍तानात जूनपर्यंत 2 कोटींवर पोहोचू शकतो कोरोनाग्रस्तांचा आकडा, अशी असूशकते जगाची स्थिती

Next
ठळक मुद्देपाकिस्तानात कोरोना ग्रस्तांची संख्या 878वर पोहोचली आहे पाकिस्तानातील सिंधमध्ये सर्वाधिक 394 कोरोनाग्रस्त पाकिस्‍तानात रुग्णालये, डॉक्टर्स आणि कोरोना टेस्टिंग किटचीही कमतरता 


नवी दिल्‍ली - पाकिस्‍तानात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तेथील दैनिक द डॉनने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोरोना व्हायरसला आळा घालता आला नाही, तर जूनपर्यंत हा आकडा 2 कोटींपर्यंत पोहोचेल. हा आकडा पाकिस्तानची चिंता वाढवणारा आहे. सध्या पाकिस्तानात कोरोना ग्रस्तांची संख्या 878वर पोहोचली आहे. 

अशी आहे पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्या - 

येथे सिंधमध्ये 394, पंजाबमध्ये 249, बलूचिस्‍तानात 110, पाकव्याप्त कश्‍मिरात 72, खैबर पख्‍तूंख्‍वांमध्ये 38 आणि इस्‍लामाबादमध्ये 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जगाचा विचार करता आणि जागतीक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीप्रमाणे तब्बल 190 देशांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. यामुळे 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

संपूर्ण जगात 6 अब्जपर्यंत जाऊ शकते कोरोना बाधितांची संख्या -

डॉनने दिलेल्या या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की कोरोना व्हायरस संपूर्ण जगात वेगाने पसरत चालला आहे. यामुळे संपूर्ण जग भयभीत आहे. एवढेच नाही, तर या व्हायरससंदर्भात मोठ्या प्रमाणावर अफवादेखील पसरत आहेत. अद्याप याचे विक्राळ रूप दिसणे बाकी आहे. या वृत्तानुसार, जून 2020पर्यंत कोरोना बाधितांची संख्या 2 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्यामते हा आकडा केवळ पाकिस्‍तानचा आहे. तर जुलै 2020पर्यंत संपूर्ण जगात कोरोना बाधितांची संख्या 6 अब्जपर्यंत जाऊ शकते. या संकटापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाकिस्तानला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. मात्र यासाठी सरकारची इच्छा शक्ती आणि जनतेचेही सहकार्य, तेवढेच आवश्यक आहे.

कोरोनाचा सामना कर्यासाठी पाकिस्तानकडे 'या' गोष्टींचीही कमतराता -

कोरोनाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानकडे कुठल्या आवश्यक उपायांची कमतरता आहे, हेही या वृत्तात सांगण्यात आले आहे. या वृत्तात एका रुग्णाचाही उल्लेख करण्यात आला आहे. हा रुग्ण खोकला आणि ताप आल्यानंतर स्वतःच रुग्णालयात गेला. मात्र, तेथे तपासण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने त्याला परत घरी पाठवण्यात आले. या शिवाय या वृत्तात पाकिस्‍तानातील प्रसिद्ध वकील ओसामा सिद्दिकी यांचाही उल्लेख आहे. ज्या काही दिवसांपूर्वीच मालदिववरून परतल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, या व्हायरसला रोखण्यासंदर्भात त्यांना विमानतळावर कसल्याही प्रकारची उपाययोजना दिसली नाही. तेथे केवळ, सवदी अरेबिया आणि इराणमधून आलेल्या नागरिकांनी तपासणीसाठी वेगळे व्हावे, अशी एकच अनाउन्समेंट सुरू होती. तेथील स्टाफकडे आवश्यक ती उपकरणेही नव्हती. एवढेच नाही, तर विमानतळावरील स्‍टाफजवळ मास्‍क आणि हातात मेडिकल ग्लोजदेखील नव्हते, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे.  

या वृत्तात पाकिस्‍तानातील रुग्णालयांची कमतरता, कोरोना टेस्टिंग किटची कमतरता, डॉक्‍टरांची कमतरता आणि औषधींची कमतरता, आदी गोष्टींचाही उल्लेख केला आहे. याशिवाय कोरोना जागतीक महामारी असल्याचे घोषित होईपर्यंत पाकिस्तान सरकार ढिम्म होते, असेही या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

या वृत्तानुसार, सध्या पाकिस्तानात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1000च्या जवळपास आहे. 27 मार्चपर्यंत हा आकडा 1020, 2 एप्रिलपर्यंत 2040, 8 एप्रिलपर्यंत 4080, 14 एप्रिलपर्यंत 8160, मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 65280 आणि जूनपर्यंत 2 कोटी होण्याची शक्यता आहे. 

डेंग्यूचे रुग्णही समोर येण्याची शक्यता

हा अहवाल अॅनालिस्‍ट ओसामा रिझवी आणि अहसान जाहिद यांनी डेटा अॅनालिस्‍ट टॉमस प्‍यूओ यांच्या मदतीने तयार केला आहे. रुग्णांच्या संख्येबरोबरच आवश्यक गोष्टींची कमीही वाढत जाईल. या शिवाय मे आणि जूनमध्ये डेंगूचे रुग्णही समोर यायला लागतील, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे. 

जगभरात 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण - 
संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 हजार 497 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा विचार करता, भारतात आतापर्यंत 492 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढलून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यापैकी 34 रुग्ण पूर्ण पणे बरे झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार इटलीमध्ये सोमवारी कोरोणा व्हायरसमुळे आणखी 602 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 6,078वर पोहोचला आहे.
 

Web Title: Over 2 crore pakistanis could be impacted by corona till june sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.