भीषण आहे हे... 30 टक्के पाकिस्तानी पायलट बोगस लायसन्सवर उडवतात विमान!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 06:28 PM2020-06-25T18:28:30+5:302020-06-25T18:29:43+5:30
कोरोनावर चर्चा, अन् अतीआत्मविश्वासामुळे झाली कराची विमान दुर्घटना
मागील महिन्यात कराची येथे झालेल्या विमान अपघातात 97 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तान नागरी उड्डाण मंत्रालयानं चौकशीला सुरुवात केली आणि त्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानच्या 30 टक्के वैमानिकांकडे परवानेच ( लायसेन्स) नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरी उड्डाण मंत्री घुलाम सरवार खान यांनी ही माहिती दिल्याचे वृत्त CNNने प्रसिद्ध केले. राष्ट्रीय सभेत बोलताना खान यांनी सांगितले की, 260 वैमानिकांनी परीक्षेसाठी पैसे देऊन दुसऱ्यांनाच बसवल्याचे उघड झाले आहे.
दहशतवादी हल्ला होणार नाही, याची हमी द्याल का?; बीसीसीआयचा पीसीबीवर पलटवार
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सने ( पीआयए) बनावट परवाने असलेल्या वैमानिकांवर कारवाई केली आहे. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय सेवेसाठी पाकिस्तानात 850 वैमानिक कार्यरत आहेत. मागील महिन्यात पीआयएच्या विमानाचं कराचीत अपघात झाले होते आणि त्यात 97 लोकांचा जीव गेला होता.
खान यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की,''त्या विमानाचा वैमानिक सतत कोरोना व्हायरसबाबत चर्चा करत होता आणि त्याचं विमान उडवण्यावर लक्ष नव्हतं. त्याच्या कुटुंबीयातील व्यक्तींना कोरोना झाल्याचे तो सांगत होता. एअर ट्राफीक कंट्रोलरकडून मिळणाऱ्या सूचनांकडे त्याचं लक्ष नव्हतं. कंट्रोल टॉवरनं त्याला विमान थोड्या उंचीवर नेण्यास सांगितले, तेव्हा मी परिस्थिती हाताळेन असा अती आत्मविश्वास त्यानं व्यक्त केला.''
22 मे रोजी Airbus A320 हे विमान लाहोर ते कराची जात होतं, परंतु कराची येथील जिन्नाह आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक विमान अपघात झाला. त्यातील 91 प्रवाशी आणि 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वाटतेय भीती; BCCI कडून मागितली लेखी हमी
दिल्ली डेअरडेव्हिल्सनं विराट कोहलीला संघात का घेतलं नाही ? मोठा खुलासा
IPL 2020 साठी BCCIने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली विनंती!
Photo : या सुंदरीनं जिंकलाय जगातील 'सेक्सी' रेफरीचा किताब; फुटबॉलपटूही पडलेत प्रेमात!
पाच महिन्यांनंतर रोहित शर्मा मैदानावर सरावासाठी उतरला; म्हणाला...