अतिप्रमाणात पॉर्न पाहणारे लोक असतात 'धार्मिक'

By admin | Published: May 17, 2016 08:51 PM2016-05-17T20:51:47+5:302016-05-17T20:53:22+5:30

पॉर्न आणि धर्माचा दूरदूर पर्यंत कोणताही संबंध नाही, ते तुम्हालाही माहीत आहे. परंतु जास्त पॉर्नोग्राफी पाहणारे लोक मोठ्या प्रमाणात धार्मिक होतात असे एका संशोधनाद्वारे आढळून आले आहे

Over-the-counter porn people are 'religious' | अतिप्रमाणात पॉर्न पाहणारे लोक असतात 'धार्मिक'

अतिप्रमाणात पॉर्न पाहणारे लोक असतात 'धार्मिक'

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ : पॉर्न आणि धर्माचा दूरदूर पर्यंत कोणताही संबंध नाही, ते तुम्हालाही माहीत आहे. परंतु जास्त पॉर्नोग्राफी पाहणारे लोक मोठ्या प्रमाणात धार्मिक होतात असे एका संशोधनाद्वारे आढळून आले आहे. एखादा पॉर्न पाहत नसल्यास आपण त्याला धार्मिक असल्याचं म्हणतो पण सॅम्युयल पेरी यांच्या सर्वेक्षणानुसार पॉर्नोग्राफी पाहणारेच अधिक धार्मिक असतात. पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांच्या मनात एक न्यूनत्वाची भावना तयार होते, त्यांना काही काळानंतर 'गिल्टी फील' होते. त्यामुळे ते प्रार्थना अधिक तीव्रतेने करतात. ज्या लोकांना कधीच पॉर्न पाहिलेले नाही ते अधिक निर्मळ असल्याचेही आढळून आले. त्यांचा धर्मावरील विश्वास अढळ असल्याचे लक्षात आले.
 
अमेरिकेतील पॉर्नोग्राफी दर्शकांसाठी हा एक नैतिक संभ्रम असल्याचे पेरी यांनी म्हटले आहे. पॉर्न पाहावे की नाही याबाबत धार्मिक लोकांच्या मनात एक संशय येत राहतो त्यातून मनात गंड निर्माण होतो. त्यातूनच ते ईश्वराची प्रार्थना करतात असे पेरी यांनी म्हटले आहे. परंतु, जर रोजच पॉर्नोग्राफी पाहण्याची सवय लागली तर दर्शक धार्मिक बनत नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.
जे लोक आठवड्यात दोन पेक्षा अधिक वेळा पॉर्नोग्राफी पाहतात ते आठवड्यातून एक वेळ पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांपेक्षा जास्त धार्मिक असतात. अमेरिकेतील संशोधक सॅम्युयल पेरी यांनी १,३०० पेक्षा अधिक अमेरिकन लोकांवर संशोधन करुन हा निष्कर्ष काढला आहे.
 

Web Title: Over-the-counter porn people are 'religious'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.