ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करताय? मग हे वाचा,कामाच्या ताणाने ओढवला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 12:49 PM2017-10-06T12:49:00+5:302017-10-06T13:00:24+5:30

जपानमध्ये महिन्यात 159 तास ओव्हरटाईम केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Overtime at the office? Then read it, work stressed death | ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करताय? मग हे वाचा,कामाच्या ताणाने ओढवला मृत्यू

ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करताय? मग हे वाचा,कामाच्या ताणाने ओढवला मृत्यू

Next
ठळक मुद्दे जपानमध्ये महिन्यात 159 तास ओव्हरटाईम केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नॅशनल ब्रॉडकास्टरमधील राजकीय पत्रकार मिवा सादो या महिलेचा जुलै 2013 मध्ये ह्रदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

टोक्यो- जपानमध्ये महिन्यात 159 तास ओव्हरटाईम केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नॅशनल ब्रॉडकास्टरमधील राजकीय पत्रकार मिवा सादो या महिलेचा जुलै 2013 मध्ये ह्रदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. मिवाला नोकरी देणाऱ्या व्यक्तीने नुकतंच या बद्दलची माहिती सर्वांना सांगितली. मिवाचा मृत्यू ऑफिसमध्ये ओव्हरटाईम केल्यानेच झाला, असं लेबर इंस्पेकर्टने सांगितलं आहे. 31 वर्षीय मिवाचा ओव्हारटाईम केल्याने मृत्यू झाला आहे. तिने एका महिन्यात फक्त दोन दिवस सुट्टी घेतली, बाकीचे सगळे दिवस तिने ऑफिसमध्ये ओव्हरटाईम केल्याचं जपान टाइम्सने म्हंटलं आहे.

द इंडिपेंन्डटच्या वृत्तानुसार,पत्रकार मिवाचा मृत्यू स्थानिक निवडणुकांच्या रिपोर्टिंगनंतर तीन दिवसांनी झाला. ब्रॉडकास्टरच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मिवाचा मृत्यू आमच्या संघटनेत असणाऱ्या समस्या दाखविणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या अवस्थेबद्दलची माहिती समोर येते आहे. तसंच निवडणुकीच्या काळात इथे कशा प्रकारे काम केलं जात, याबद्दलच्या गोष्टी निदर्शनास आणून देणार आहे.

मिवाच्या मृत्यूच्या तिच्या आई-वडिलांना चांगलाच धक्का बसला आहे. मिवाला जाऊन चार वर्ष झाली तरी ही गोष्ट आम्ही मान्य करू शकतो नाही, असं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे. 

2015मध्ये एका अॅडव्हरटाईजिंग एजन्सिमध्ये एका कर्मचाऱ्याचा 100 तास काम केल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर देशात कार्यसंस्कृती बदलण्याची मागणी करण्यात आली होती. एका राष्ट्रीय सर्व्हेच्या अनुसार जपानमध्ये 20 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये ओव्हरटाईम केल्याने मृत्यूचा धोका आहे. ही 20 टक्के लोक महिन्यात 80 तास ओव्हरटाईम करतात. जपान सरकारने नुकतीच तेथिल कार्यपद्धतीवर तोडगा काढण्यासाठी पाऊलं उचलली होती. फेब्रुवारी महिन्याच जपान सरकारने एक कॅम्पेन सुरू केलं होतं. त्यामध्ये ऑफिस कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता ऑफिसमधून निघायला सांगण्यात आलं.  या नियमांचं पालन न करणाऱ्या जवळपास 300 कंपन्यांवर नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. 

Web Title: Overtime at the office? Then read it, work stressed death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.