याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी
By सायली शिर्के | Updated: September 24, 2020 15:54 IST2020-09-24T15:36:25+5:302020-09-24T15:54:12+5:30
कारवांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरनेस्ट गार्सिया-2 यांनी एका दिवसात तब्बल 51,471 कोटींची म्हणजेच जवळपास 7 बिलियन डॉलर्सची तगडी कमाई केली आहे.

याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात करोडपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. जुन्या कार विकून करोडपती झाल्याची घटना घडली आहे. जुन्या कार विकणारी कंपनी कारवां (Carvan Co.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरनेस्ट गार्सिया-2 यांनी एका दिवसात तब्बल 51,471 कोटींची म्हणजेच जवळपास 7 बिलियन डॉलर्सची तगडी कमाई केली आहे. शेअर बाजारात तेजी आल्याने त्यांना मोठा फायदा झाला आहे.
अरनेस्ट गार्सिया-2 आणि त्यांचा मुलगा अरनेस्ट गार्सिया-3 हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सने (Bloomberg Billionaires Index) दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची एकूण संपत्ती ही आता 1,58,825 कोटींहून अधिक झाली आहे. अरनेस्ट गार्सिया-2 यांच्या वडिलांचं न्यू मेक्सिकोमध्ये दारूचं दुकान होतं. अरनेस्ट गार्सिया-2 यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडलं होतं. मात्र नंतर त्यांनी एरिझोना युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
शिक्षणमंत्र्यांनी केला विद्यार्थ्यांचा सत्कार, बक्षिस म्हणून दिल्या नव्या कोऱ्या 'कार'https://t.co/GpDel5wdkL#education#Exams#Students#Car
— Lokmat (@MiLOKMAT) September 24, 2020
जुन्या कार विकणाऱ्या कंपनीचा मालक करोडपती
1991 साली त्यांनी कार भाड्याने देणारी कंपनी अग्ली डकलिंग (Ugly Duckling) खरेदी केली.गार्सिया-2 यांनी ही कंपनी खरेदी केल्यानंतर त्या माध्यमातून जुन्या कार विकायला सुरुवात केली. ही कंपनी अशा लोकांना कार विकते ज्यांना क्रेडिट स्कोर लक्षात घेता कोणती बँक कार लोन देत नाही. त्यानंतर त्यांचा बिझनेस हा झपाट्याने वाढू लागला. 1996 मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचं लिस्टिंग NASDAQ मध्ये केलं. तसेच आपल्या कंपनीचं नाव बदलून त्यांनी Carvana Co. ठेवलं.
कंपनीचं दरवर्षी 20 लाख जुन्या कार विकणं लक्ष्य
कोरोनाच्या काळात अमेरिकेत वापरलेल्या कारची मागणी वाढू लागली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये यावर्षी आतापर्यंत 150 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अरनेस्ट गार्सिया-2 यांची संपत्ती 15 अब्ज डॉलर्स झाली आहे. अरनेस्ट गार्सिया-3 कारवांचे सीईओ असून त्यांची संपत्ती आता 6.21 बिलियन डॉलर्स झाली आहे. दरवर्षी 20 लाख जुन्या कार विकणं हे कंपनीचं लक्ष्य आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तब्बल 55 एकर शेतजमीन अन् बरंच काही...; अधिकाऱ्याच्या घरावर एसीबीचा छापा, घबाड पाहून अधिकारीही चक्रावलेhttps://t.co/tcMqi3oKQ6#crime#Police#anticorruption#ACB
— Lokmat (@MiLOKMAT) September 24, 2020
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप
क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ
'मी मास्क घालत नाही' म्हणणाऱ्या भाजपा नेत्याचा यू-टर्न, म्हणाले...; Video व्हायरल
"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन", राहुल गांधींचा घणाघात
लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च