ओम्याकोन जगातील सर्वांत थंड ठिकाण; कडाक्याच्या थंडीतही मुले जातात शाळेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 05:49 AM2020-12-24T05:49:48+5:302020-12-24T05:50:14+5:30

Oymyakon : डिसेंबर महिन्यात येथे सकाळी दहा वाजता सूर्योदय होतो. येथे कार किंवा मोटारी बंद ठेवून चालत नाहीत.  कारण एकदा बंद केल्या की त्या पुन्हा चालू करणे महाकठीण काम असते.

Oymyakon is the coldest place in the world; Even in the bitter cold, children go to school | ओम्याकोन जगातील सर्वांत थंड ठिकाण; कडाक्याच्या थंडीतही मुले जातात शाळेत

ओम्याकोन जगातील सर्वांत थंड ठिकाण; कडाक्याच्या थंडीतही मुले जातात शाळेत

googlenewsNext

ओम्याकोन (रशिया) : रशियातील  सैबेरिया प्रांतात असलेल्या ओम्याकोनची जगात सर्वांत थंड ठिकाण म्हणून नोंद आहे. या ठिकाणी तापमान उणे ५० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते.  हिवाळ्यात येथे प्रचंड थंडी असल्याने कोणतेही पीक घेतले जात नाही. येथील लोक मुख्यत्वे विविध प्रकारच्या प्राण्यांचे मांस खाऊनच जगतात. रेनडियर आणि घोड्याचे मांस हे त्यांचे प्रमुख अन्न असून स्ट्रॉगेनिना मासा ते आवडीने खातात.
     डिसेंबर महिन्यात येथे सकाळी दहा वाजता सूर्योदय होतो. येथे कार किंवा मोटारी बंद ठेवून चालत नाहीत.  कारण एकदा बंद केल्या की त्या पुन्हा चालू करणे महाकठीण काम असते. थंडीमुळे मोटारीची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. 
येथील शाळकरी मुले उणे ५० अंश तापमानातही शाळेत जात असतात. येथील कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी मुलांना तापमानानुसार प्रशिक्षण दिले जाते. ५० अंशापेक्षा कमी तापमान झाल्यानंतर मात्र येथील शाळा बंद केल्या आहेत. 
२०१८च्या नोंदीनुसार या गावात सुमारे ९०० लोकसंख्या आहे. येथे सर्वांत कमी तापमान १९२४ मध्ये नोंदवले गेले. त्या वेळी  येथील तापमान उणे ७१.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले  होते. अंटार्क्टिका खंडाबाहेर असणारे हे सर्वांत थंड ठिकाण समजले जाते. येथील सरासरी तापमान उणे ५० अंश सेल्सिअस असते. (वृत्तसंस्था)

सर्वांत कमी तापमान
१९२४ मध्ये नोंदवले गेले. त्या वेळी येथील तापमान उणे ७१.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते.  

Web Title: Oymyakon is the coldest place in the world; Even in the bitter cold, children go to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.