छोटा राजनला भारतात आणण्याच्या तयारीला वेग
By admin | Published: October 30, 2015 09:54 PM2015-10-30T21:54:02+5:302015-10-30T21:54:02+5:30
छोटा राजन याला भारतात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. उभय देशांमध्ये गुन्हेगार देवाणघेवाण करण्याचा करार झाला असून त्याची अमलबजावणी करून छोटा राजन प्रकरणाला गती दिली जात आहे.
बाली : छोटा राजन याला भारतात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. उभय देशांमध्ये गुन्हेगार देवाणघेवाण करण्याचा करार झाला असून त्याची अमलबजावणी करून छोटा राजन प्रकरणाला गती दिली जात आहे.
भारताचे इंडोनेशियातील राजदूत गुरजित सिंग म्हणाले की, ‘‘प्रत्यार्पण करार आणि कायद्याचे साह्य देवाणघेवाणीचा करार उभय देशात आधीच झालेला असून त्यांच्या अमलबजावणीच्या पत्रांची देवाणघेवाण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात होईल.’’ या दोन करारांशी संबंधित प्रक्रिया अन्सारी यांच्या दौऱ्याच्यावेळी होत आहे हा केवळ योगायोग आहे. मुद्दाम त्यासाठी घाई केली जात नाही, असे सिंग म्हणाले. राजनला भारतात पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असे सांगून गुरजित सिंग म्हणाले, राजनने इंडोनेशियन अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली, असे म्हणणे केवळ अफवा व समज करून घेण्यासारखेच आहे. इंडोनेशिया व भारत यांच्यात गुन्हेगार देवाणघेवाणीचा करार २०११ मध्ये झाला परंतु त्याची अमलबजावणी झालेली नाही. (वृत्तसंस्था)